गोव्यात काँग्रेस फूटीच्या मार्गावर :विश्वजीत

0
1064

गोव्यात आणि देशात काँग्रेसला भवितव्य राहिलेले नाही.राष्ट्रपती निवडणुकीवेळी काँग्रेस 16 आमदार असताना फक्त 11 जणांनी काँग्रेस उमेदवाराला मतदान केले होते.विकस कामे करता येत नसल्याने काँग्रेस मधील अनेक आमदार वैतागले आहेत.सध्याची परिस्थिती बघितली तर गोव्यात काँग्रेस केव्हाही फुटू शकते,असा दावा आरोग्यमंत्री तथा वाळपईचे भाजप उमेदवार बिश्वजीत राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केला. काँग्रेसच्या अधोगतीला राहुल गांधी हेच जबाबदार असून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी जे बोलून दाखवले त्यातून काँग्रेसने धडा घेण्याची गरज आहे असा सल्ला राणे यांनी काँग्रेसला दिला.
वाळपई मतदारसंघात काँग्रेस नावाला सुद्धा शिल्लक राहिलेली नाही.रवी नाईक आपल्या मुलाचा प्रचार करण्यासाठी धारबांदोडा आणि फोंड्यातील कार्यकर्ते आणून प्रचार करत आहेत असा आरोप राणे यांनी केला. वाळपई मतदारसंघाचा विकस करण्यात आपण कोणतीच कमतरता ठेवलेली नाही.उसगाव भागाच्या विकसासाठी 3 प्रकल्प मंजूर झाले असून तेथील विकसकामांचा बैकलॉग लवकरच भरून काढला जाणार आहे असे राणे म्हणाले.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि पर्ये मतदारसंघाचे आमदार आपले वडील असून पोटनिवडणुकीसाठी त्यांचे आशीर्वाद असून ते काँग्रेससोबत नाही तर आपल्या सोबत आहेत असे विश्वजीत यांनी स्पष्ट केले.
वाळपई नगरपालिकेच्या नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी राणे यांची पणजी येथील कार्यालयात भेट घेऊन वाळपईची पूर्ण जनता विश्वजीत यांच्या पाठीशी खंबीर उभी असल्याचे स्पष्ट केले.