गोव्यात ‘एन्.आर्.सी.’ लागू करा !

0
373

पणजी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी

गोवा खबर: बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या समस्येवर उपाययोजना म्हणून गोव्यात ‘एन्.आर्.सी.’ लागू करा, अशी मागणी येथील आझाद मैदानात  राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या छत्राखाली  हिंदूत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शनेद्वारे केली. या वेळी ‘सनबर्न क्लासिक’च्या परिसरात तीन युवकांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा नोंदवणे आणि ‘सनबर्न क्लासिक’सारख्या ‘इ.डी.एम्.’ महोत्सवांवर राज्यात कायमस्वरूपी बंदी आणणे, नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सी.ए.ए.) विरोधात आंदोलनात सार्वजनिक संपत्तीची हानी करणार्‍यांकडून नुकसान भरपाई वसूल करून घेणे आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागण्या करण्यात आल्या. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचा हा एक भाग आहे.
शंखनाद केल्यानंतर निदर्शनांना प्रारंभ झाला. राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या वतीने हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक यांनी प्रस्तावना करतांना निदर्शनांचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी आंदोलनाला संबोधित केले.

भारतात बांगलादेशी घुसखोरांची समस्या ही दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. तब्बल ५ कोटींहून अधिक बांगलादेशी घुसखोर मुसलमान भारतात रहातात. भारतीय जनतेच्या मूलभूत सुविधांवर या घुसखोरांमुळे अधिक ताण येत आहे. याहून गंभीर म्हणजे यांच्यापैकी अनेक जण आतंकवादी, तसेच राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये गुंतले असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. गोव्यातील भंगार गोळा करणे, केशकर्तनालय, भाजी विक्री, मासे विक्री आणि अन्य व्यवसायात बांगलादेशी नागरिकांचा सहभाग आहे. गोव्यात वेश्याव्यवसायात बांगलादेशी युवतींचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. गोव्यात घुसखोरी करणार्‍या बांगलादेशींची संख्या सध्या अल्प असली, तरी त्यांच्या विरोधात आताच ठोस कारवाई न केल्यास पुढे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता आहे. गोव्यात निरनिराळ्या व्यवसायात गुंतलेल्या बांगलादेशी घुसखोरांना पाठिंबा देणार्‍यांवर कारवाई करणे, घुसखोरांची सूची, छायाचित्रे संबंधित भागांमध्ये प्रसारित करणे, नोकरी देतांना संबंधितांची पार्श्‍वभूमी नीट तपासणे, तसेच घुसखोरांना आश्रय देणार्‍यांवरही कठोर कारवाई करणे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

भारताच्या सीमा अवैधपणे ओलांडून भारतात येण्यास कोणी धजावणार नाही, अशी या घुसखोरांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. गोव्यात ‘राष्ट्रीय नागरिकता नोंदणी’ (एन्.आर्.सी.) लागू करून बांगलादेशी घुसखोरांना गोव्यातूनच नव्हे, तर देशातून बाहेर हाकलून लावावे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.

शेवटी हिंदु जनजागृती समितीचे  गोविंद चोडणकर यांनी ठराव मांडले, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रर्दशन  शैलेश बेहरे यांनी केले.