गोव्यात उद्या दाखल होणार मान्सून:पणजी वेधशाळेची माहिती

0
1148
उद्या पासून 5 दिवस मूसळधार पाऊस,कोकणात सुद्धा उद्याच धडकणार मान्सून
गोवा खबर:केरळ मध्ये वेळे आधी धडकुन कारवारच्या वेशीवर रेंगाळलेला मान्सून उद्या गोव्यात दाखल होणार आहे.उद्या पासून पुढचे 5 दिवस मुसळधार पाऊस होईल असा अंदाज गोवा वेधशाळेचे संचालक एम. एल.साहू यांनी व्यक्त केला आहे.
नियोजित वेळे नुसार मान्सून 6 जून रोजी गोव्यात दाखल होतो.मात्र आज मान्सून येण्याची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत.आज कडक उन पडले असले तरी मान्सूनला पोषक वातावरण तयार झाले असून उद्या मान्सून गोव्यात आणि दक्षिण कोकणात दाखल होईल असे गोवा वेधशाळेने कळवले आहे.
28 मे रोजी वेळे आधी केरळ मध्ये पोचलेला मान्सून त्याच वेगाने गोव्याच्या वेशीवर असलेल्या कर्नाटक मधील कारवार पर्यंत अवघ्या 24 तासात पोचला होता.मात्र त्यानंतर मान्सून गतीहीन झाल्यामुळे पुढे सरकू शकला नव्हता.मात्र आता मान्सून पुढे सरकण्यासाठी आवश्यक असलेले पच्छिमी वारे जोर धरु लागले असून उद्या मान्सून गोव्या बरोबर कोकणात दाखल होईल असा अंदाज गोवा वेधशाळेने वर्तवला आहे.
5 दिवसात मूसळधार ते अती मूसळधार पावसाची शक्यता
उद्या मान्सूनचे आगमन झाल्या नंतर पहिले 2 दिवस सर्वत्र मूसळधार पाऊस होणार आहे.त्या नंतरच्या 3 दिवसात अती मुसळधार पाऊस पडणार असून गरज असेल तरच घरा बाहेर पडा असा इशारा गोवा वेधशाळेने दिला आहे.