गोव्यात उद्या थर्टी फर्स्टची धमाल!

0
1424
गोवा खबर:सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी देश विदेशातून लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.किनारे पर्यटकांनी गजबजून गेली असून बहुतेक सर्व हॉटेल्स हाऊसफुल झाली आहेत.
थर्टी फर्स्ट अर्थात सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकां बरोबर सेलिब्रेटी देखील गोव्यात दाखल झाले आहेत.उद्या रात्री ठीकठीकाणी जंगी पाटर्या आयोजित करण्यात आल्या असून त्यात देखील सेलिब्रेटी हजेरी लावणार आहेत.प्रख्यात पंजाबी गायक मिखा सिंग गोव्यात दाखल झाला असून उद्या तो पणजीतील मांडवी नदी मधील कॅसिनो प्राइड मध्ये आपल्या लोकप्रिय गाण्यांवर उपस्थितांना थिरकायला लावनणार आहे.
याशिवाय उद्योग, न्यायालय,राजकरण,बॉलीवुड मधील दिग्गज देखील नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत.
आर्यलंडचे पंतप्रधान लिओ वराडकर आपल्या सिंधुदुर्गमधील मुळ घराला भेट देऊन सह कुटुंब गोव्यात दाखल झाले असून ते नवीन वर्षाचे स्वागत गोव्यात करणार  आहेत.1 जानेवारीला दुपारी ते आर्यलंडला रवाना होणार आहेत.
किनाऱ्यांवरील शॅक,हॉटेल्स आणि रेस्टोरेन्ट मध्ये सांगित रजन्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.किनाऱ्यांवर दृष्टि लाइफ सेविंग तर्फे पुरेसे जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.