गोव्यात आता 7 जूनपर्यंत संचारबंदी : मुख्यमंत्री

0
52
गोवा खबर : गोव्यात कोविड संकट अजूनदेखील गंभीर असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील राज्यस्तरीय संचारबंदी  7 जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे.
राज्यात सध्या राज्यव्यापी संचारबंदी सुरु आहे. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. 7 जूनला सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तसे आदेश जारी केले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
गोव्यामध्ये सध्या संचारबंदी असून सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु असतात. उद्योग धंदे सुरू आहेत. साप्ताहिक बाजार आणि मासळी ते बाजार बंद आहेत. सिनेमागृहे, जलतरणतलाव, सलून, स्पा, सांस्कृतिक आणि धार्मिक बंद आहेत. अजूनदेखील कोविड रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याने संचारबंदी वाढवण्यात आली आहे.