गोवा:पर्यटकांचे नंदनवन असलेल्या गोव्याचे पर्यावरण राखण्यासाठी उपयुक्त ठरेल अशी प्रदूषण विरहीत इलेक्ट्रिक बस आज पासून गोव्यातील रस्त्यांवरुन धावणार आहे.मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याहस्ते कदंबच्या पणजी बस स्थानकावर आज या बसचे उद्धाटन करण्यात आले.मुख्यमंत्र्यांनी बस मधून फेरफटका मारल्या नंतर प्रयोगिक प्रयोग यशस्वी ठरला तर अशा बसेस कदंबच्या ताफ्यात दाखल करून घेतल्या जाणार असल्याचे सांगितले.
प्रायोगिक तत्वावर ही बस दररोज 200 किमी गोव्यातील रस्त्यांवर धावणार आहे.या बसमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण देखील होत नाही.पर्वरी येथे ही बस चार्ज करण्यासाठी व्यवस्था करून देण्यात आली आहे.ही बस दिव्यांग फ्रेंडली आहे.37 आसनी बस 50 आसनी करण्याचा कदंबचा विचार आहे.
यावेळी वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर,कदंबचे अध्यक्ष कार्लुस आलमेदा उपस्थित होते.