गोव्यात आढळले आज 174 कोविडचे रुग्ण

0
404
गोवा खबर:गोव्यात आज नव्याने 174 कोविडचे रुग्ण आढळले तर 114 जण बरे होऊन घरी गेले.1 हजार 666 रुग्ण आज विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.मांगोर हिल येथील 71 वर्षीय इसमाचे काल रात्री उशिरा कोविड हॉस्पिटलमध्ये निधन झाल्याने मृतांचा आकडा 29 झाला आहे.
राज्यात आतापर्यंत 4 हजार 350 रुग्ण सापडले असून त्यातील 2 हजार 655 जण बरे होऊन घरी गेले आहेत.अजूनही 1 हजार 666 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.मृतांचा आकडा वाढत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यातच पर्यटन उद्योग सुरु केल्याने नवीन संकट उभे ठाकत आहे.रस्ता,रेल्वे आणि विमान मार्गे आलेल्यांपैकी 132 जण कोविडग्रस्त झाले असून त्यांच्यामुळे देखील रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.
आरोग्य खात्याने आरोग्य केंद्र निहाय दिलेल्या रुग्णांची आकडेवारी पाहिली तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळीत उत्तर गोव्यातील सर्वाधिक म्हणजे 91 रुग्ण आहेत.उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या पेडणेत 26,आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या वाळपईत 7,म्हापशात 63,स्मार्ट सिटी असलेल्या राजधानी पणजीत 35,कासारवर्णेत 18,कोलवाळेत 43,खोर्लीत 25,चिंबलमध्ये 87,पर्वरीत 22 रुग्ण आहेत.
दक्षिण गोव्यातील आकडेवारी पहिल्यास मूरगाव तालुक्यात गंभीर परिस्थिती आहे.वास्को केंद्रा अंतर्गत 373 आणि कुठ्ठाळीत सर्वाधिक 400 रुग्ण आहेत.मांगोर हिल नंतर वास्कोत लॉक डाउन न केल्याने राज्यभरात कोविडचा सामुदायिक प्रसार झाला आहे.मडगावमध्ये 72,कुडतरीत 19,लोटलीत 24,केपेत 11,धारबांदोडयात 42,फोंडयात 49 तर नावेलीत 18 रुग्ण असून एके काळी कोविड मुक्त झालेल्या गोव्याच्या दृष्टिने वाढत चाललेले रुग्ण आणि मृतांचा आकडा निश्चितच चिंतेची बाब बनली आहे.