गोव्यात आज मूसळधार पावसाची शक्यता

0
968

गोवा खबर:19,20 आणि 22 जून रोजी गोव्यात मूसळधार पाऊस पडेल अशी शक्यता पणजी वेधशाळेने वर्तवली आहे.गेल्या 24 तासात राजधानी पणजीमध्ये सर्वाधिक 3 इंच पावसाची नोंद झाली आहे.काल झालेल्या मूसळधार पावसामुळे पणजी मध्ये बहुतेक भाग जलमय झाले होते.
काल मूसळधार पावसाचा फटका पणजीला बसला.सकाळ पासून झालेल्या मुसळधार पावसामुळे मीरामार,सांतिनेज,डॉन बोस्को शाळा, मळा,कांपाल मैदान,ताळगाव आदी ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले होते.क्रांतीदिन सोहळ्याचा आझाद मैदानावरील मुख्य कार्यक्रम देखील भर पावसात पार पडला. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक प्रभावित झाली होती.राज्यात आता पर्यंत 20.48 इंच पावसाची नोंद झाली आहे.