गोव्यात १० मार्चपासून शिगमोत्सवाची धूम

0
811
गोवा खबर:फेब्रूवारी अखेरीस कार्निव्हल मधील किंग मोमोची राजवट संपल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवडयात राज्यात शिमगोतस्वाची धूम अनुभवायला मिळणार आहे.कार्निव्हल आणि शिमगोत्सव अनुभवण्यासाठी देश विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात येत असतात.
पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पाटो येथील पर्यटन भवनमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत राज्यस्तरीय शिमगोत्सव आयोजनाच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेवर चर्चा करण्यात आली.
पर्यटन सचिव श्री अशोक कुमार, पर्यटन संचालक मिनिनो डिसौझा, महापौर उदय मडकईकर, नगरपालिकांचे अध्यक्ष, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी आणि इतर उपस्थित होते.
शिगमोत्सव मिरवणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे- १० रोजी फोंडा, ११ मार्च सांगे, १२ रोजी केपे, १३ रोजी शिरोडा, १४ रोजी पणजी, १५ रोजी मडगांव, १६ रोजी डिचोली, १७ रोजी सांखळी, १८ रोजी वास्को, १९ रोजी कुंकळ्ळी, २० रोजी काणकोण, २१ रोजी कुडचडे, २२ रोजी म्हापसा, २३ रोजी पेडणे आणि २४ रोजी वाळपई येथे.