गोव्यातील सबर्बन डायग्नॉस्टिक्सला पहिली स्टँडअलोन लॅब म्हणून एनएबीएलची मान्यता

0
1171

गोव्यात कार्यरत झाल्यापासून २ वर्षांतच देशातील तांत्रिकष्ट्या अद्ययावत निदान केंद्र असलेल्या सबर्बन
डायग्नॉस्टिक्सला गोवा राज्यातील केवळ पॅथॉलॉजी लॅबरोटरी म्हणून एनएबीएलची मान्यता मिळाली आहे. यापूर्वी
एनएबीएलच्या मान्यताप्राप्त लॅब या हॉस्पिटल आणि सीआरओंशी संलग्न अशा आहेत. सबर्बन डायग्नॉस्टिक्स
(एनएबीएल आणि सीएपी मान्यताप्राप्त) डॉक्टर आणि रुग्णांसाठी एक प्रमुख निदान केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे.
हाय-एंड निदान चाचण्यांसह गोव्यातील सबर्बन डायग्नॉस्टिक्समध्ये सर्व प्रकारच्या, नियमित निदान चाचण्याही केल्या
जातात.
सबर्बन डायग्नॉस्टिक्सची स्थापना १९९४ साली झाली असून अल्पावधीतच सर्वंकष निदान सेवा केंद्र म्हणून नावारूपाला
आले आहे. मुंबईतील ग्रँड मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असलेले आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल, जॉन हापकिन्स आणि
हेन्री फोर्ड हॉस्पिटल, अमेरिका म्हणून सायटोपॅथॉलॉजीमध्ये विशेष कौशल्य असलेले डॉ. संजय अरोरा हे सबर्बन
डायग्नॉस्टिक्सचे प्रमुख आहेत.
नॅशनल अॅक्रिडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन लॅबरोटरीज (एनएबीएल) ही संस्था भारतातील दर्जा समितीचा
एक भाग असून प्रयोगशाळांमधील विविध प्रक्रिया, कामकाजांचे दर्जात्मक मानांकने स्थापित किंवा निश्चित करण्याचे
काम करत असते. भारतामध्ये प्रयोगशाळा मान्यता ही एक स्वेच्छिक प्रक्रिया असून या प्रक्रियेतील निकष खूप कडक
व त्यांचे व्यवस्थापन किंवा पालन करणे खर्चिक वाटत असल्याने सर्वच घटक या प्रक्रियेचा अवलंब करत नसल्याचे
चित्र आहे. अशा स्थितीत एनएबीएलची मान्यता म्हणजे सबर्बन डायग्नॉस्टिक्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा
तुरा असून यामुळे गोव्यामध्ये रक्त चाचण्या करण्यासाठी विश्र्वासार्ह आणि प्राधान्य संस्था म्हणून या केंद्राला पावती
मिळाली आहे. जागतिक दर्जाची ही सुपरस्पेशालिटी लॅब आके-मडगाव येथे कार्यरत असून या लॅबमध्ये रॉश-
स्वित्झर्लंड, बायो रॅड-अमेरिका, हॉरिबा टेक्नॉलॉजिस- जपान कंपन्यांची अद्ययावत साधने व उपकरणे उपलब्ध असून
पेटंटप्राप्त दर्जाहमी व्यवस्थापन प्रणालीचा अवलंब केला जातो आणि या प्रदेशात सर्वोत्तम म्हणून ही प्रणाली ओळखली
जाते.
याविषयी व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय अरोरा म्हणाले, “दोन वर्षांपूर्वी गोव्यातील या केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी या
संस्थेला गोव्यातील पहिली स्टँडअलोन पॅथॉलॉजी लॅबरोटरी म्हणून घडवण्याचे वचन आम्ही दिले होते. स्थापनेपासूनच
गोव्यातील या लॅबमध्ये एनएबीएलसह जगातील उच्च दर्जांच्या मानांकनांचा अवलंब आम्ही करत आलो आहोत. आता
अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी जी प्रक्रिया आणि कालावधी लागतो, त्यानुसार १० ऑगस्ट २०१७ रोजी आमच्या या
लॅबला अधिकृत मानांकन मिळाले आणि त्यामुळे ८हून अधिक मान्यताप्राप्त संकलन केंद्रांसह या लॅबला गोव्यातील
पहिली स्टँडअलोन एनएबीएल मान्यताप्राप्त पॅथॉलॉजी लॅबरोटरी म्हणून मान्यता मिळाली आहे.”

सीओओ  रविंद्र देसाई म्हणाले, “गोव्यातील स्पेशलाइज्ड पॅथॉलॉजी चाचण्यांची मोठी मागणी पाहून आम्ही गोव्यात
कार्यविस्तार करण्याचे नियोजन केले आहे. आमच्या लॅबवर विश्र्वास व्यक्त करत आम्हाला अव्वल स्थानी

पोचवण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे योगदान दिलेले वैद्यकीय क्षेत्रातील कार्यरत प्रतिनिधी, हॉस्पिटल आणि लॅब यांचे
आम्ही ऋणी आहोत.”
सध्या सबर्बन डायग्नॉस्टिक्सची गोवा राज्यात आके, केपे, नावेली, चिंचणी, फातोर्डा, बेताळभाटी, पणजी आणि
चिखली-दाबोळी येथे केंद्रे कार्यरत असून या केंद्राने जागतिक दर्जाची लॉजिस्टिक शीतसाखळीशी जोडण्यात आले असून
त्यामुळे निदाननमुन्यांचा दर्जा योग्य राखणे व निदानचाचण्यांचा अहवाल वेळेवर तयार करणे सुलभ बनले आहे.
कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी तीन अद्ययावत केंद्रे उभारण्याचे नियोजन असून २०१७-१८ आर्थिक
वर्षांच्या शेवटच्या तिमाहीत ही केंद्र कार्यरत होऊ शकतील.
सबर्बन डायग्नॉस्टिक्सने जागतिक दर्जाचे घरी सेवा देण्याचे जाळे गोव्यातील आपल्या केंद्रांच्या कार्यकक्षेत विकसित
केले असून रुग्णाच्या घरी वैद्यकीय चाचणीसाठी योग्य नमुना घेण्यासाठी अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांचे पथक नेहमी
सज्ज असते. त्यामुळे रुग्णांची व डॉक्टरांचीही मोठी सोय झाली आहे. अचूकता व सुरक्षा या बाबींना सर्वोच्च प्राधान्य
देत जागतिक मानांकनांचे अवलंब होत असल्याची खात्री या होम विजिट प्रक्रियेतून साधली जात आहे.
गोव्यातील प्रमुख हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांसमवेत सहकार्य सबर्बन डायग्नॉस्टिक्सने साधले असून त्याद्वारे
स्पेशलाइज्ड व सुपर स्पेशलाइज्ड नमुना चाचण्या तातडीने करणे शक्य झाले असून चाचणी झाल्याच्या दिवशीच
चाचणीचा अहवाल संबंधित घटकांपर्यंत पोचवणे शक्य झाले आहे. सबर्बन डायग्नॉस्टिक्सची सेवा उपलब्ध होण्यापूर्वी
थायरॉइड, एलएच एफएसएच प्रोलॅक्टिन, बिटा एचसीजी, विटामिन डी आदी प्रकारच्या चाचण्यांसाठी नमुने मुंबईला
पाठवावे लागत असत आणि त्यामुळे चाचणीचे अहवाल मिळण्यात दिरंगाई होत असे व खात्रीशीर चाचणीवर प्रश्नचिन्ह
उत्पन्न होत असे.
देशभरातील सबर्बन डायग्नॉस्टिक्सच्या बहुतांश लॅबना एनएबीएलची तसेच सेंट्रल प्रोसेसिंग लॅबोरेटरी (कॅप- कॉलेज
ऑफ अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट)ची मान्यता मिळालेली आहे. या कंपनीचा मुख्य उद्देश हा दर्जा होय. नियमित व
सामान्य चाचण्यांबरोबरच ट्यमुर मार्कर्स, हॉर्मोन्स, जीवनसत्वे, प्रोकॅल्सिटॉनिन, एलिसा आदी विशेष चाचण्याही सबर्बन
डायग्नॉस्टिक्सद्वारे गोव्यात केल्या जातात.
आजवर सबर्बन डायग्नॉस्टिक्सने एक कोटीहून अधिक निदान चाचण्या केल्या असून त्याद्वारे २० लाखांहून अधिक
रुग्ण, ८०हून अधिक पदव्युत्तर वैद्यकीय स्पेशालिस्ट, १००हून अधिक केंद्रे व अत्याधुनिक प्रयोगशाळांना दर्जेदार निदान
सेवा उपलब्ध केली आहे. एनएबीएल आणि सीएपी अशा सर्वोत्तम जागतिक संस्थांचे मानांकन सबर्बन डायग्नॉस्टिक्सला
मिळालेले आहे.
गोव्यातील पहिली व मान्यताप्राप्त स्टँडअलोन प्रयोगशाळा म्हणून बोर्ड ऑफ दि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाद्वारे
मान्यता मिळण्याचा मान ही बाब सबर्बन डायग्नॉस्टिक्स-गोव्याच्या प्रवासात एक मैलाचा दगड आहे. केवळ ६
महिन्यांत हे मान्यता निकष व प्रक्रिया पूर्ण करण्याची खात्री गोव्यातील चमूने आपल्या कामकाजातून निश्चिती केली.