गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी समांतर प्रवेशाची तरतूद आणि 10 टक्के शिष्यवृत्ती

0
174

 

जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीने 2021 साठी प्रवेश प्रक्रिया केली सुरू

 

 गोवा खबर:जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीतर्फे संपूर्ण दक्षिण भारतात 1988 पासून वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. या इन्स्टिट्यूटने शैक्षणिक वर्ष 2021 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. भारतभरातील 38 हून अधिक लर्निंग सेंटर्ससह जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी ही संस्था संबंधित विषयातील थिअरी आणि उद्योग क्षेत्रातील अनुभवाचा उत्तम मेळ साधत सखोल डिझाइन शिक्षण देण्यात आघाडीवर आहे.

जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट, डिप्लोमा आणि पोस्ट डिप्लोमा प्रोग्राम्समध्ये प्रचंड पर्याय उपलब्ध आहेत. यात फॅशन डिझाइन, इंटेरिअर डिझाइन, ज्युलरी डिझाइन, फॅशन कम्युनिकेशन, फॅशन आणि लाईफस्टाईल आंत्रप्रेन्युअरशीप, फॅशन बिझनेस मॅनेजमेंट, व्हिज्युअल मर्कंडायझिंग, फॅशन फोटोग्राफी तसेच हेअर अॅण्ड मेकअप आर्टिस्ट्री असे विविध विषय उपलब्ध आहेत. रीसर्च, मेंटरिंग, प्रॅक्टिकल संधी आणि क्लासरूममधील प्रशिक्षणाचा सुयोग्य मेळ साधत ही इन्स्टिट्यूट विद्यार्थ्यांना भविष्यातील इंडस्ट्री एक्सपर्ट बनण्याच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावते.

त्याचप्रमाणे, जेडी इन्स्टिट्यूटतर्फे अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट प्रोग्राम्समध्ये अनुसूचित जाती/जमाती तसेच माजी सैनिकांच्या मुलांना 2021 पासून नवी 10 टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये जेडी इन्स्टिट्यूटमध्ये उपब्लध सर्व अंडरग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट प्रोग्राम्समधील प्रवेशासाठी ही 10 टक्के शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, योग्य कागदत्रे आणि सर्व प्रकारच्या फॉरमॅलिटीज पूर्ण केल्यास जेडी इन्स्टिट्यूटतर्फे अनुसूचित जाती/जमातीतील विद्यार्थ्यांना अनुसूचित जाती आणि जमाती महामंडळ तसेच सामाजिक हित विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या सुयोग्य लाभांसाठीही प्रोत्साहन दिले जाते. मागास वर्गातील विद्यार्थ्यांना सुयोग्य कागदपत्रे असल्यास वार्षिक फीचा 100 टक्के रिफंडही मिळवता येईल.

“समाजातील सर्व गटांना कोणत्याही भेदभावाशिवाय उच्च शिक्षण उपलब्ध करून देणे हाच साम्यवादी पद्धतीने शिक्षण देण्याचा एकमेव मार्ग आहे. सर्जनशील उद्योगक्षेत्राला पुढे घेऊन जाण्यास उत्सुक असलेल्या महत्त्वाकांक्षी प्रोफेशनल्सना उत्तम डिझाइन शिक्षण देण्यासाठी जेडी इन्स्टिट्यूट नेहमीच प्रयत्नशील आहे. हे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे,” असे जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या दक्षिण विभागाच्या संचालक सँड्रा सीक्वेरा म्हणाल्या.

त्याचबरोबर जेडी इन्स्टिट्यूटने 2021 पासून फॅशन अॅण्ड अपीरल डिझाइन आणि इंटेरिअर डिझाइन डिग्री कोर्सेससाठी समांतर प्रवेश प्रक्रियाही लागू केली आहे. जेडी इन्स्टिट्यूटच्या गोव्यातील पणजी ब्रांचमध्ये फॅशन अॅण्ड अपीरल डिझाइन आणि इंटेरिअर डिझाइनच्या बीएस्सी कोर्ससाठी समांतर प्रवेशाची तरतूद आहे. तर, बंगळुरुमध्ये फॅशन अॅण्ड अपीरल डिझाइनच्या बीएस्सी कोर्ससाठी समांतर प्रवेशाची तरतूद आहे. सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना डिझाइन शिक्षण मिळावे आणि ते जागतिक दर्जाचे असावे या दृष्टीने समांतर प्रवेश हे फार महत्त्वाचे पाऊल आहे.

उदयोन्मुख फॅशन डिझाइनर्ससाठी जेडी इन्स्टिट्यूटमध्ये फॅशन अॅण्ड अपीरल डिझाइनमध्ये बीएस्ससी, फॅशन अॅण्ड टेक्सटाईल डिझाइनमध्ये एमस्सी, फॅशन कम्युनिकेशनमध्ये एमए, फॅशन बिझनेस अॅण्ड इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये एमबीए, फॅशन डिझाइन अॅण्ड मॅनेजमेंटमध्ये एमएस्सी, फॅशन डिझाइन/फॅशन स्टायलिंग/इंटरनॅशनल फॅशन स्टायलिंग/फॅशन बिझनेस मॅनेजमेंट/व्हिज्युअल मर्कंडायझिंगमध्ये डिप्लोमा असे विविध अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट आणि डिप्लोमा प्रोग्राम उपलब्ध आहेत.

इंटेरिअर डिझाइन विभागात जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये विविध प्रकारचे अंडरग्रॅज्युएट, पोस्टग्रॅज्युएट आणि डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत. जेडी इन्स्टिट्यूटच्या दक्षिण भारतातील सर्व शाखांमध्ये इंटेरिअर डिझाइनमधील बीएस्सी आणि एमएस्सी कोर्सेस आहेत. त्याचप्रमाणे, जेडी इन्स्टिट्यूटतर्फे इंटेरिअर डिझाइनमध्ये डिप्लोमा आणि अॅडव्हान्स्ड डिप्लोमा कोर्सेसही उपलब्ध आहेत.