गोव्यातील पणजी येथे प्रादेशिक स्तरावरील डाक अदालतचे आयोजन

0
89

गोवा खबर : गोवा विभागाचे पोस्टमास्टर जनरल यांच्या वतीने, दिनांक 21 जून रोजी 2021 दुपारी 12:00 वाजता, 48 व्या प्रादेशिक स्तरावरील डाक अदालतचे पोस्टमास्टर जनरल, गोवा विभाग, पणजी 403001 येथे आयोजन करण्यात आले आहे.

या डाक अदालत द्वारे गोवा विभागातील, ज्यावर 6 आठवड्यांत तोडगा निघालेला नाही, अशा प्रकारच्या पोस्टविषयक सेवांबाबतच्या गाऱ्हाणे  / तक्रारी तक्रारी  निकाली काढल्या जातील. मेल, स्पीड पोस्ट, काउंटर सर्व्हिसेस, सेव्हिंग्ज बँक आणि न भरणा झालेल्या मनी ऑर्डरबाबतच्या तक्रारींचा यावेळी विचार केला जाईल. उपस्थित केलेल्या तक्रारीत, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार केली गेली होती त्याची तारीख, नाव आणि  पदनाम यासारख्या बाबींचा तपशील नमूद केलेला असावा. इच्छुक ग्राहक टपाल सेवांबद्दल आपली तक्रार दोन प्रतींमधे, रमेश प्रभू, सचिव, टपाल सेवा आणि सहायक संचालक टपाल सेवा, पोस्टमास्टर जनरल कार्यलय, गोवा विभाग,  पणजी 403001 या पत्त्यावर पाठवू शकतात. तक्रार पाठविण्याची अंतिम तारीख 11 जून 2021 ही आहे

टपाल सेवा, ही प्रत्येक नागरीकाच्या जीवनाला स्पर्श करणारी सेवा असून  देशाच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पोस्ट विभाग आपल्या ग्राहकांना  संपूर्णपूणे समाधानकारक सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असताना, दळणवळणातील अंतर आणि सेवेतील त्रुटी अधूनमधून घडतात ज्यामुळे गाऱ्हाणी आणि तक्रारी वाढत असतात. अशा गाऱ्हाणी / तक्रारींचे प्रभावी पद्धतीने निवारण करण्यासाठी विभाग वेळोवेळी टपाल अदालतीचे आयोजन करत असतो, जिथे विभागातील अधिकारी समाधान न झालेल्या ग्राहकांना भेटतात, त्यांच्या तक्रारींबद्दल तपशील गोळा करतात आणि लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतात.