गोव्यातील ताजमध्ये होणार ईस्टरचे चवदार सेलेब्रेशन

0
1306

 

 पणजी: या ईस्टर संडेला तुमच्या आवडत्या माणसांसोबतचे संस्मरणीय क्षण साजरे करा
गोव्यातील सगळ्या ताज हॉटेल्समध्ये. भरगच्च बुफेपासून ईस्टरचे वैशिष्ट्य असलेल्या गोड पदार्थांपर्यंत
सगळ्याची रेलचेल करून ताजने या सणाची परंपरा आणि त्यातील जिव्हाळा जिवंत केला आहे. अनुभवांची
एक अविस्मरणीय जंत्री आणि अनेक सुखद धक्के तुमची वाट बघत आहेत!
ताज एक्झॉटिका रिसॉर्ट अॅण्ड स्पा, गोवा
गोव्याच्या ताज एक्झॉटिका रिसॉर्ट अॅण्ड स्पामधील ईस्टर संडे विशेष लंचच्या सोबतीने ईस्टरची चैन करा.
मित्रमंडळी आणि कुटुंबियांसमवेत एकत्र वेळ घालवा आणि त्याचवेळी नवीन ऑल-डे डायनर सला दा
प्रांझोमधील शेफ्सनी विशेष तयार केलेल्या पदार्थांनी रसनेला तृप्त करा.
एक एप्रिल, दुपारी १२:३० ते ३:००.
आरक्षणासाठी संपर्क साधा +९१ ८३२ ६६४ ५८५८ या क्रमांकावर.


विवांता बाय ताज, पणजी
लॅटिट्युड या ऑल-डे डायनरने वायदा केला आहे पारंपरिक खाद्यपदार्थ, सणासुदीची खास पेये, मनोरंजन
आणि सुखद आश्चर्याचे काही धक्के यांच्या रेलचेलीसह एक चवदार अनुभव देण्याचा. ईस्टर संडे सेलिब्रेशन
तुम्हाला अनोखी संधी देत आहे हॉटेलमध्ये एक नाइट स्टे जिंकण्याची. गोडाधोडाने स्वत:चे लाड करायला
आवडते अशांसाठी कॅरामलने ईस्टर विशेष पदार्थांची मालिकाच आणली आहे. यामध्ये चॉकलेट एग्ज,
बनीज, कॅरट केक आणि मार्झिपान पदार्थांसह अनेक पदार्थांचा समावेश आहे.
लॅटिट्यूडमध्ये ईस्टर ब्रंच – एक एप्रिल, दुपारी १२:३० ते १५:३०
कॅरामलमध्ये ईस्टर गुडीज- २५ मार्चपासून सुरू, सकाळी ते १०:०० – रात्री १०:००
आरक्षणासाठी संपर्क साधा, +९१ ८३२ ६६३६६३६ या क्रमांकावर.
ताज फोर्ट अग्वाडा रिसॉर्ट अॅण्ड स्पा, गोवा
ईस्टर खऱ्याखुऱ्या चैतन्यात साजरा करा गोव्याच्या ताज फोर्ट अग्वाडा रिसॉर्ट अॅण्ड स्पामध्ये. ४२
एकरांच्या देखण्या परिसरात पसरलेले हे रिसॉर्ट १७व्या शतकातील किनारपट्टीवरील पोर्तुगीज
किल्ल्याच्या तटबंदीत बांधलेले आहे. हा आनंदाचा सण साजरा करा तुमच्या आवडत्या व्यक्तींच्या
सहवासात कोकम किचनमधील भरगच्च ब्रंचसमवेत. मधुर चवीच्या चाहत्यांनी चविष्ट डेझर्ट्सच्या
मदतीने रसनेची तृप्ती करावी आणि पारंपरिक ईस्टर एग हंटचे साहसही अनुभवावे.

१ एप्रिल, दुपारी १२:३० ते ३:३०.
आरक्षणासाठी संपर्क करा +९१ ८३२ ६६४ ५८५८ या क्रमांकावर.
ताज हॉलिडे व्हिलेज रिसॉर्ट अॅण्ड स्पा, गोवा
गोव्यातील ताज हॉलिडे व्हिलेज रिसॉर्ट अॅण्ड स्पाने यंदा ईस्टरचे भरघोस सेलेब्रेशन आयोजित केले आहे.
सणाच्या मौजमजेने भरलेल्या प्रथांना चवदार खाद्यपदार्थांची रुचकर जोड देण्यात आली आहे.
देशोदेशीच्या खाद्यपदार्थांचा आणि आमच्या विशेष एग स्टेशनचा आस्वाद मनाचे समाधान होईपर्यंत
घ्या. लोकप्रिय चॉकलेट ईस्टर एगसह तोंडाला पाणी सुटेल अशा डेझर्ट्सच्या मालिकेसह स्वत:चे लाड करा.
मजेदार ईस्टर एग हंटमध्ये सहभागी होऊन ईस्टरचे चैतन्य आपल्यात भरून घ्या.
१ एप्रिल, दुपारी १२:३०ते ३:३०.
आरक्षणासाठी संपर्क साधा +९१ ८३२ ६६४ ५८५८ या क्रमांकावर.
ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट्स सफारीजविषयी
ऐषोरामाचा अस्सल अनुभव हवा असलेल्या जगातील सर्वांत चिकित्सक पर्यटकांना सेवा देणारा ताज हॉटेल
पॅलेसेस रिझॉर्ट सफारीज हा इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड अर्थात आयएचसीएलचा प्रतिष्ठित ब्रॅण्ड
१९०३ सालापासून कार्यरत आहे. जगविख्यात लॅण्डमार्क्सपासून ते आधुनिक बिझनेस हॉटेल्सपर्यंत,
रमणीय बीच रिझॉर्ट्सपासून ते अस्सल भव्य राजवाड्यांपर्यंत ताजच्या सर्व हॉटेल्समध्ये भारतीय
आतिथ्यशीलता, जागतिक दर्जाची सेवा आणि आधुनिक ऐषोराम यांचा मिलाफ साधलेला आहे. मुंबई
येथील ताज महाल पॅलेस हॉटेल म्हणजे समूहाचा मुकुटमणी असून, सर्वोत्तम सुसंस्कृत राहणीमान,
कल्पकता आणि जिव्हाळ्याचा मापदंड या हॉटेलने निर्माण केला आहे. कडवे श्रम आणि कडवा श्रमपरिहार
(वर्क-हार्ड, प्ले-हार्ड) या तरुणांच्या जीवनशैलीला साजेसा आधुनिक आणि सृजनशील आतिथ्याचा अनुभव
विवांतामध्ये मिळतो. गेटवे हॉटेल्सचे वैशिष्ट्य म्हणजे पाहुण्यांना ताजेतवाने करणारा, निवांत अनुभव
तसेच दर्जा, सेवा व शैलीतील सातत्य.
इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचा (आयएचसीएल) ताज हॉटेल्स पॅलेसेस रिझॉर्ट्स सफारीज हा प्रमुख ब्रॅण्ड
आहे. आयएचसीएलचा इकॉनॉमी विभागातील हॉटेल्सचा जिंजर ब्रॅण्डही भारतातील ब्रॅण्डेड बजेट
हॉटेल्सच्या क्षेत्रातील पहिला ब्रॅण्ड असून सर्वांत मोठाही आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड सॅट्स (पूर्वीचे
नाव सिंगापोर एअरपोर्ट टर्मिनल सर्व्हिसेस) या हवाई खानपानसेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसोबत
ताजसॅट्स एअर केटरिंग ही सेवा जॉइंट व्हेंचरच्या स्वरुपात देते. महत्त्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या हवाई
वाहतुकीमध्ये या सेवेद्वारे अन्नपदार्थ पुरवले जातात.
अधिक माहितीसाठी कृपया www.tajhotels.com इथे भेट द्या.

ताज हॉटेल्स पॅलेसेस रिसॉर्ट्स सफारीजिवषयी
१९०३ मध्ये स्थापन झालेल्या ताज हॉटेल्स पॅलेसेस रिसॉर्ट्स सफारीज हा आशियातील एक सर्वात
मोठा आणि सर्वोत्कृष्ट हॉटेल्सचा समूह आहे. भारत, उत्तर अमेरिका, युनायटेड किंगडम, आफ्रिका,
मध्य पूवर्, मलेशिया, श्रीलंका, मालदिव, भूतान आणि नेपाळ असे जगभरातील ६१ ठिकाणी त्यांची
९८ हॉटेल्स आहेत. जगप्रसिद्ध ठिकाणांपासून आधुनिक बिझनेस हॉटेल्स, नयनरम्य बीच रिसॉर्ट्स
ते अस्सल ग्रँड पॅलेस… ताजचे प्रत्येक हॉटेल देते भारतीय पाहुणचाराची ऊब, जागतिक दर्जाच्या
सेवा आणि आधुनिक सूखसुविधांचा उत्तम मिलाफ. शतकाहून अधिक काळ मुंबईतील द ताज
महाल पॅलेसने राहण्याची सर्वोत्तम सोय, नाविन्यता आणि प्रेमाची ऊब असा सर्वोत्कृष्ट अनुभव
देण्यात एक नवा मापदंडच स्थापन केला आहे. ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स अॅण्ड पॅलेसेस हा टाटा ग्रूप
या भारतातील आघाडीच्या बिझनेस समुहाचा भाग आहे.