गोव्यातील गुंतवणूक वाढीसाठी मुख्यमंत्र्यांची रशियात मोर्चेबांधणी

0
1376
गोवा खबर: दीर्घकालीन पावसाळी अधिवेशन यशस्वीपणे हाताळल्या नंतर गोव्यात परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज सोमवारी  मुख्यमंत्री सावंत यांनी रशियामध्ये एका परिषदेत भाग घेतला. 

खनिज, धातू, मासेमारी अशा विषयाशीनिगडीत एका सत्राचे अध्यक्षस्थान देखील मुख्यमंत्री सावंत यांनी भुषवले.
 केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ रशियाला गेले आहे. देशातील पाच राज्यांचे मुख्यमंत्री या शिष्टमंडळाचा भाग आहेत.

 सोमवार व मंगळवार असे दोन दिवस व्लादिवोस्तोक, रशिया येथे परिषद चालेल. विविध सत्रे पार पडतील. भारत व रशियामधील उद्योगांचे प्रतिनिधीही परिषदेत सहभागी झाले आहेत. ज्या सत्राचे अध्यक्षस्थान भुषविले, त्याविषयीची छायाचित्रे सावंत यांनी रशियामधून सोशल मीडियावर अपलोड केली आहेत.

 मुख्यमंत्री 14 रोजी रात्री गोव्यात परततील आणि 15 रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ते सहभागी होतील.