गोव्यातील खाण प्रश्न केंद्रात सत्तेत येणारे मोदी सरकार सोडवेल:सुरेश प्रभू

0
847
गोवा खबर: गोव्यातील खाणी बंद असल्याने हजारो खाण अवलंबीतांवर ओढवलेल्या संकटाची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.हा विषय केंद्रात येणारे भाजप सरकार सोडवणार आहे.पर्यावरणाचे भान राखून खाण व्यवसाय सुरु करण्यावर आमचे प्राधान्य राहणारअसल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी पणजी येथील पत्रकार परिषदेत आणि पर्वरी येथील बूथ कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केले. 
प्रभू म्हणाले,देशात पुन्हा नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेवर यायला हवे असे देशातील जनतेला वाटत आहे.
खाण व्यवसाय बंदीचा परिणाम गोव्यातील सामाजिक जीवनावर  झाला आहे. खाणबंदीमुळे लोक प्रचंड अडचणीत आले आहेत. गोव्यातील खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी कायदेशीर पद्धतीने तोडगा काढण्यावर भर दिला जाणार आहे. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी आपण स्वतः अनेक बैठका घेतल्या व प्रयत्न केले. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी आपण अनेकवेळा चर्चा केली. खाणबंदीमुळे लोक त्रासात आहेत. त्याचबरोबर लोकांनी कर्जेही घेतली आहेत. त्यामुळे शक्य तेवढया लवकर खाण व्यवसायावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही प्रभू यांनी सांगितले.
गोव्यातील दोन्ही जागा भाजप जिंकणार, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला. उत्तर गोव्याचे खासदार व केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी खुप काम केले आहे. आयुष खात्यांतर्गत त्यांनी देशभरात कार्यक्रम केले आहेत. त्याचबरोबर दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनीही भरपूर काम केल्याचे ते म्हणाले.
गोवा हे एक महत्त्वाचे राज्य आहे. खाणव्यवसाय, पर्यटन आणि मच्छीमार व्यवसाय गोव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. गोव्यात योग्य पद्धतीने खाण व्यवसाय करणे शक्य आहे. त्याचबरोबर पर्यावरणपूरक असा पर्यटन व्यवसायही शक्य आहे. सागरी उत्पादन निर्यातीद्वारे मोठा व्यवसाय करणे शक्य आहे. पूर्व आणि पश्चिम किनारी भागात लॉजिस्टिक हब होणे गरजेचे आहे. गोव्याचा विकास हा गोमंतकीयांना लाभ मिळवून देणारा असायला हवा, असेही ते म्हणाले.
मोदी सरकारच्या काळात देशाचा मोठा विकास झाला. त्यामुळे देशात पुन्हा मोदींचे सरकार यावे असे लोकांना वाटते. आपण अनेक राज्यामध्ये प्रचार केला. कर्नाटक, महाराष्ट्र, पं. बंगाल या राज्यांमध्ये प्रचार केला. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या कारकिर्दीत देशाची आर्थिक स्थिती आणि आर्थिक वाढ चांगली राहिली. मोदी सरकारच्या कारकिर्दीत 540 बिलीयन डॉलर एवढी निर्यात करण्यात आली. जी आतापर्यंत सर्वोच निर्यात आहे.
 सुविधा निर्माण करण्यात आल्या. रेल्वेच्या साधनसुविधा निर्मितीसाठी 8.54 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले. सामाजिक क्षेत्रात मोदींनी अनेक उपक्रम राबविले. व्यावसायिक वातावरण चांगले राहिले. आर्थिक सामाजिक स्तरावर चांगले काम केले. मोदींची प्रतिमा जगभरात वाढली. स्टार्टअपसारखे उपक्रम युवकांसाठी महत्त्वाचे आहेत. स्टार्टअप महोत्सव गोव्यात व्हायला हवा. जेणेकरून रोजगार निर्मिती होईल. गोव्यातील लोकांना फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने विकासावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.
काळा पैसा पूर्णपणे बंद करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करणार. काळा पैसा वेगवेगळय़ा पद्धतीने येतो. सरकारमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने काळा पैसा बंद होणे गरजेचे आहे. काळा पैसा हा गरीब जनतेचा खरा शत्रू आहे. काळय़ा पैशाविरोधात अधिकाऱयांनी योग्य कारवाई करायला हवी, असेही ते म्हणाले.