गोव्यातील खाणींसाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे गडकरींना साकडे

0
889

गोवा:गोव्यातील खाणी लवकरात लवकर सुरु कराव्यात अशी मागणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाने आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर,सभापती प्रमोद सावंत,आमदार राजेश पाटणेकर,आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार नीलेश काब्राल,आमदार निळकंठ हळर्णकर,खासदार नरेंद्र सावईकर,आमदार प्रसाद गावकर आणि आमदार दीपक प्रभू पावसकर यांचा समावेश होता.हे शिष्टमंडळ केंद्रीय वीज मंत्र्यांना भेटून त्यांना आपल्या मागण्याचे निवेदन देणार आहे.खाणी बंद पडल्या तर खाण अवलंबित उध्वस्त होण्याची शक्यता असल्याने सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारच्या माध्यमातून उच्च पातळीवर प्रयत्न करण्याचे ठरवले आहे.