गोव्यातील आपल्या ब्रँड सेंटरचे उद्घाटन झाल्याची मिडलबाय सेलफ्रॉस्टची घोषणा

0
757

गोवा खबर:  अमेरिकेतील मिडलबाय कार्पोरेशन समूहाचा भाग असलेल्या मिडलबाय सेलफ्रॉस्टने मे. सुविधा किचन या चॅनेल पार्टनरच्या माध्यमातून आल्त-पर्वरी गोवा येथे आपल्या ब्रँड सेंटरचे उद्घाटन झाल्याची घोषणा केली आहे. उद्घाटन प्रसंगी मिडलबाय सेलफ्रॉस्ट इनोवेशन प्रा. लि.चे संचालक श्री. बालाजी सुब्रमण्यम, सह-उपाध्यक्ष (जनरल मार्केट) श्री. विपिन सेठी, सरव्यवस्थापक सुमन घोष आणि चॅनेल पार्टनर मे. सुविधा किचन-गोवाचे श्री. साहिल अरोरा उपस्थित होते.

शिकागो (इलिनॉसिस, अमेरिका) येथे मुख्यालय असलेला मिडलबाय कॉर्पोरेशन हा समूह अन्न सेवा उपकरण क्षेत्रातील एक जागतिक अग्रणी आहे. कंपनीमध्ये १०,०००हून अधिक कर्मचारी कार्यरत असून कंपनीचे १५०हून अधिक देशांमध्ये कार्य चालते. कंपनीचे जगभरात १००हून अधिक विक्री व उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीचे बाजारमूल्य ७.५ अब्ज अमेरिकी डॉलर इतके आहे, तर २०१८ सालचे महसुली उत्पन्न ३ अब्ज अमेरिकी डॉलर इतके होते. अन्न सेवा उपकरणे, अन्न प्रक्रिया तसेच प्रिमिअम रेसिडेन्शियल उपकरणे श्रेणींमधील उत्पादनांचे मिडलबाय कॉर्पोरेशनचे ९०हून अधिक ब्रँड बाजारात आहेत.
मिडलबाय सेलफ्रॉस्ट ही व्यावसायिक रेफ्रिजरेटर, कोल्डरूम, आइस मशिन, फ्रिझर्स अशा प्रकारची व्यावसायिक उत्पादने व सेवा देणारी भारतातील अग्रणी व लोकप्रिय कंपनी असून ती सेलफ्रॉस्ट ब्रँडखाली आपली उत्पादने सादर करते. भारतातील अनेक रेस्टॉरंट साखळ्या आणि हॉटेल समूहांना उत्पादने पुरवठा करण्यात सेलफ्रॉस्ट अग्रेसर आहे.
उद्घाटनप्रसंगी मिडलबाय सेलफ्रॉस्ट इनोवेशन प्रा. लि.चे संचालक श्री. बालाजी सुब्रमण्यम म्हणाले, “ग्राहक आमच्यासाठी सर्वस्व आहेत, त्यांच्याशिवाय आम्ही कोणी नाही. विद्यमान विक्री आणि पणन सुविधांचा प्रभावी वापर करत गोव्यासारख्या बाजारपेठेमध्ये सेलफ्रॉस्ट ब्रँड आणि त्याअंतर्गत येणाऱ्या उत्पादनांची श्रेणी सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
मिडलबाय सेलफ्रॉस्ट इनोवेशन प्रा. लि.चे सह-उपाध्यक्ष (जनरल मार्केट) श्री. विपिन सेठी म्हणाले, “येत्या पर्यटन हंगामामध्ये गोव्यातील हॉस्पिटॅलिटी बाजारात सर्वत्र आमची उत्पादने पोचवण्याचा आणि गोव्यामध्ये आमचे बाजारस्थान बळकट करण्याचे नियोजन आहे. ग्राहकांना योग्य, प्रभावी व तत्पर सेवा देण्यासाठी कंपनीची इन-हाऊस सर्व्हिस टीम कार्यरत आहे, तसेच टोल-फ्री क्रमांक, ऑनलाइन सेवेद्वारेही ग्राहकांना सेवा उपलब्ध केली जाते. तसेच ग्राहकांच्या समाधानासाठी तंत्रज्ञानाचे पथकही नेहमी सज्ज असते. आम्ही सुस्पष्ट आणि नियोजित अशी ग्राहकाधिष्ठित सेवायंत्रणा विकसित केली असून त्याद्वारे ग्राहकांना विना-कटकट सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो.”
कंपनीचे भारतामध्ये व्यापक मार्केटिंग आणि सेवा जाळे विकसित झाले आहे, यामध्ये १५ ब्रँड सेंटर कार्यरत असून त्याद्वारे देशभर मिडलबायच्या उत्पादनांची संपूर्ण श्रेणी सादर केली जाते.
आगामी म्हणजेच २२ ते २४ ऑगस्ट २०१९ दरम्यान बांबोळी-गोवा येथील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडिअममध्ये आयोजित गोवा फूड अँड हॉस्पिटॅलिटी एक्स्पोमध्ये कंपनी आपली संपूर्ण उत्पादन श्रेणी सादर करणार आहे.