गोवाखबर :11 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन अभिषेक फडतरे निर्मित ‘वेलकम होम’हा चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमियरने होणार आहे.आपल्या चित्रपटाने #गोमचिम2018 चे उद्धाटन होणार आहे याचा आनंद शब्दात मांडता येणार नाही असाच आहे.गोव्यातील सिने रसिक दर्दी आहेत.त्यांची दाद लाख मालाची असते अशा शब्दात फडतरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांच्या दिग्दर्शना खाली बनलेल्या वेलकम होम या चित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर आपली दखल घेण्यास सगळ्यांना भाग पाडले आहे.11व्या #गोमचिम2018 चे उद्धाटन वेलमक होम च्या वर्ल्ड प्रीमियर ने होणार आहे.मुलगी नेमकी कुठली? माहेरची की सासरची अशी काहीशी वेलकम होमची संकल्पना आहे.भावे आणि सुकथकनकर यांच्या दिग्दर्शनाखाली या चित्रपटाची निर्मिती झाली आहे म्हणजे काही तरी खास आणि वेगळेपण असणार हे ओघाने आलेच. कासव  ला राष्ट्रपतींचे सुवर्ण कमळ मिळाल्या मुळे या दोघां कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खुप वाढल्या आहेत.
या चित्रपटा मध्ये मृणाल कुलकर्णी,मोहन आगाशे,सुमित राघवन,स्पृहा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.उद्धाटन सोहळ्याला ही सगळी मंडळी हजेरी लावणार असल्याचे फडतरे यांनी सांगितले आहे.
फडतरे म्हणाले,गेली 8 वर्षे मी सातत्याने #गोमचिमला हजेरी लावत आलो आहे.नेहमी नवीन सिनेमे घेऊन मी गोवेकरांच्या भेटीला आलेलो आहे.यंदा तर माझ्या वेलकम होम ने #गोमचिम2018 चे उद्धाटन होणार आहे.आमच्या साठी ही सन्मानाची गोष्ट आहे.नवा सिनेमा घेऊन गोव्यात आल्या नंतर इथल्या प्रेक्षकांची मिळणारी दाद उत्साह वाढवणारी असते.#गोमचिम मध्ये सिनेमा प्रदर्शित झाला की प्रेक्षक येऊन जी प्रतिक्रिया देतात ती प्रोत्साहन पर असते,हुरूप वाढवणारी असते.यंदा देखील तसाच प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा बाळगतो.