गोव्याच्या राज्यपालपदी सत्यपाल मलिक शपथबद्द

0
805
गोवा खबर: सत्यपाल मलिक गोव्याच्या राप्यपालपदी शपथबध्द झाले.  मलिक याना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदिप नंदराजोग यानी राजभवनात आयोजित केलेल्या कार्यक्रमात  राज्यपाल पदाची शपथ दिली.

सुरवातीस मुख्य सचिव परिमल राय यानी त्यांचा नियुक्तीचा आदेश वाचला.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यानी २५ ऑक्टोबर रोजी  मलिक यांची गोव्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली होती.
शपथविधिनंतर लगेच राज्यपालांना पोलिसांनी मानवंदना दिली
शपथविधी समारंभास मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर,विधानसभा सभापती  राजेश पाटणेकर, , विरोधी पक्षनेते  दिगंबर कामत,सार्वजनिक बांधकाममंत्री दिपक प्रभू पाउसकर,आरोग्यमंत्री  विश्वजीत राणे, कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक,बंदर खात्याचेमंत्री मायकल लोबो, आमदार सुदीन ढवळीकर, जोशुआ डिसोझा,  निळकंठ हळर्णकर,  अलिना साल्ढाणा, अँडव्होकेट जनरल  देविदास पांगम,पणजीचे महापौर उदय मडकईकर,मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योगपती,आणि स्थानिक नागरिक, उपस्थित होते.