गोव्याचे मुख्यमंत्री उद्यापासून महाराष्ट्रात प्रचाराला

0
1009
 गोवा खबर:महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्या गुरुवार पासून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंत्री,आमदार,खासदार आणि प्रमुख पदाधिकारी सक्रिय होणार आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्या गुरुवार 10 ऑक्टोबर पासून 15 ऑक्टोबर पर्यंत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात स्टार प्रचारक म्हणून सहभागी होणार आहेत.
सिंधुदुर्ग,रत्नागिरी,रायगड, मुंबई,कोल्हापुर, सातारा,कराड,सांगली,मिरज या भागात गोवा भाजपचे मंत्री,आमदार,खासदार,
पदाधिकारी प्रचार करणार आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत  कोल्हापुर,सातारा, सांगली,कराड,मुंबई मध्ये कोपरा सभा घेण्या बरोबरच युवकांशी संवाद साधून भाजपाच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.काही कार्यकर्ते आजच महाराष्ट्रात गेले असून मुख्यमंत्री आणि इतर सर्व उद्या सकाळ पासून महाराष्ट्रातील प्रचारात सक्रिय होणार आहेत.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे शिक्षण पश्चिम महाराष्ट्रात झाले आहे.शिवाय गोव्यातील बरेचजण मुंबई,पुण्यात वास्तव्याला आहेत.गोव्यातील भाजपचे नेते ही मते तेथील युतीच्या उमेदवाराला मिळावीत यासाठी प्रयत्न करणार आहेत.