गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांची आज जयंती

0
741

गोवा खबर:गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांची जयंती १२ मार्च २०१९ रोजी साजरी करण्यात येणार आहे.

याचे औचित्य साधून सकाळी ९ वाजता मिरामार येथील समाधीवर विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.१५ वा. पणजी येथील जुन्या सचिवालयाजवळ व स. ९.३० वा. पर्वरी येथील नूतन सचिवालय संकुलातील स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.