गोव्याचा डाल्टन डिसोझा रुबरू मि.इंडिया या भारतातील प्रमुख पुरुष मॉडेल स्पर्धेच्या राष्ट्रीय फेरीत करणार प्रतिनिधित्व

0
1069

गोवा खबर:भारतातील पुरुषांसाठी सर्वांत मोठी आणि लोकप्रिय स्पर्धा ठरलेली रुबरू मि. इंडिया ही स्पर्धा प्रथमच
गोव्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे. ७ ते १० मार्च गोव्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेची अंतिम फेरी १० मार्च २०१८ रोजी होणार आहे. झगमगत्या दुनियेबरोबरच या उपक्रमाद्वारे महिला
सक्षमीकरणासारख्या उदात्त कार्यालाही प्रोत्साहन, पाठबळ दिले जाते.
२८ वर्षीय डाल्टन डिसोझा हा गोमंतकीय युवक या स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. गोवा इन्स्टिट्यूट
ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक यशस्वी व्यावसायिक म्हणून त्याचा प्रवास सुरू
आहे. सडपातळ बांधा आणि उठावदार चेहरा असलेल्या डाल्टनला विविध फेऱ्यांमध्ये इतर स्पर्धकांहून सरस
ठरण्याची संधी आहे.
प्रशिक्षण व स्पर्धेच्या तयारीसाठी ७ मार्च २०१८ रोजी स्पर्धकांचे गोव्यात आगमन होत आहे. देशभर झालेल्या
निवड चाचण्यांमध्ये अंतिम फेरीसाठी आकर्षक, हुषार अशा स्पर्धकांची निवड करण्यात आली असून आता हे
स्पर्धक गोव्यात होणाऱ्या राष्ट्रीय अंतिम फेरीत अव्वल स्थानासाठी स्पर्धा करणार आहेत. संभाषण कौशल्य,
हुषारी, सादरीकरण, शारीरिक तंदुरुस्ती आदी निकषांवर या स्पर्धेतील विजेत्यांची निवड होणार आहे. प्राथमिक
फेऱ्या व चाचण्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेल्यांची जेतेपदासाठी कसोटी लागणार असून स्पर्धेतील विजेत्यांना
आगामी काळातील जागतिक स्तरावरील प्रमुख स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या २४ स्पर्धकांची नावे अशी : अंकित डी. श्रीवास्तव, आदित्य सिंह भदोरिया, अनुभव
उपाध्याय, अभिषेक ओहरी, अश्वनी नीरज, अंजुम वारिस, बालाजी मुरुगदास, दिलीप अमित पटेल, डाल्टन
डिसोझा, फरहान कुरेशी, गौरव कुमार गौतम, गौरव आनंद शर्मा, कमलेश सोळंकी, कल्पेश मनोज शर्मा, कौशल
प्रकाश पांचाळ, प्रदीप राजीव खरेरा, प्राणदिप भराली, नोन्गमैथेम राकेश सिंह, सागर प्रवीण कावा, सौरव
कमलेश ठाकूर, शिव कुमार शर्मा, सूरज प्रकाश सिंह, उज्ज्वल शर्मा आणि झुल्फिकार अझिज एसके.
रुबरू मि. इंडिया ही पुरुषांसाठीची भारतातील सर्वांत जुनी व लोकप्रिय अशी स्पर्धा गणली जाते. २००४ साली
उत्तर भारतात पुरुष मॉडेल स्पर्धा म्हणून सुरू झालेला हा उपक्रम आता जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही
देशातील लोकप्रिय पुरुष मॉडेलिंग स्पर्धा म्हणून उदयास आला आहे.
रुबरू मि. इंडिया उपक्रम १० जागतिक उपक्रमाशी संलग्न असून या माध्यमातून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
विजेत्यांना एक व्यासपीठ देऊन देशासाठी गौरवशाली, अभिमानास्पद कामगिरी केली आहे. आपल्या झगमगत्या
दुनियेबरोबरच या उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणासारख्या उदात्त कार्यालाही प्रोत्साहन, पाठबळ दिले जाते.
रुबरू मि. इंडिया विजेत्यांना या उदात्त, सामाजिक कार्यामध्ये आपले योगदान देण्याची संधी मिळते.