गोवा हे देशातील संसाधन कार्यक्षमता धोरण असलेले प्रथम राज्य.

0
421

गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी युरोपाचे भारतातील राजदूत उगो अस्टोटो यांच्यासमवेत गोव्यात संसाधन कार्यक्षमता आणि अर्थ व्यवस्था वाढ धोरणाचा शुभारंभ केला. हे धोरण तयार करण्यासाठी गोवा हे देशातील संसाधन कार्यक्षमता धोरण असलेले प्रथम राज्य बनले आहे.

द एनर्जी रिसोर्सिस इन्स्टिट्युट (टेरी) तर्फे गोवा सरकारचे सांख्यिकी व नियोजन खात्याच्या सहकार्याने पणजी येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सांख्यिकी व नियोजन खात्याचे संचालक डॉ वाय दुर्गाप्रसाद आणि पर्यावरण, उर्जा आणि हवामान बदल युरोपियन युनियन डेलिगेट टू इंडियाच्या हेनरीट फायरगेमन यावेळी उपस्थित होत्या.

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यानी अर्थ व्यवस्था कार्यक्षम करण्यासाठी संसाधने वाढविणे आणि धोरण तयार करण्यासाठी गोवा राज्याला प्रोत्साहित केल्याबद्दल नीति आयोगाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि या धोरणाचा विकास केल्याबद्दल गोवा सरकारच्या सांख्यिकी व नियोजन संचालनालयाचे अभिनंदन केले.

सहकार्याबद्दल बोलताना युरोपाचे भारतातील राजदूत उगो अस्टोटो यांनी गोव्यात संसाधन कार्यक्षमता आणि अर्थ व्यवस्था वाढ धोरण तयार करण्यासाठी गोवा राज्याला सहकार्य करण्यासाठी आम्हाला खूप आनंद होत असल्याचे ते म्हणाले.

गोवा सरकारच्या सांख्यिकी व नियोजन संचालनालयाने हे धोरण तयार केले आहे आणि द एनर्जी रिसोर्सिस इन्स्टिट्युटला हे धोरण विकसीत करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी नियुक्त केले आहे. या धोरणात पर्यटनासाठी आणि बांधकामासाठी संसाधन कार्यक्षमता नकाशा सादर आहे.

गोव्याच्या दीर्घ काळाच्या विकासासाठी आणि सामाजिक कल्याणासाठी साधनांचा न्यायपूर्वक वापर करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. चर्चेत पर्यटन, बांधकाम, सिव्हील सोसाईटी, कचरा, मरीन आणि व्यापार व इतर क्षेत्रे सहभागी झाली होती.

श्रीमती अश्विनी यानी सूत्रंचालन केले. सांख्यिकी व नियोजन संचालनालयाने उपसंचालक श्री फुर्तादो यानी आभार मानले.