गोवा हायकिंग असोसिएशनची हिमालायतील पहिली ट्रेकिंग मोहीम प्रचंड यशस्वी

0
3645

 

  • मोहीम फत्ते करून जीएचए परत, गोव्यातील तरुण, साहसप्रेमींसाठी प्रेरणादायी
  • ट्रेकिंग मोहिमेत ५०० तरुण सहभागी

गोवा खबर: गोवा हायकिंग असोसिएशनला जाहीर करताना अभिमान वाटत आहे, की ते या वर्षी हिमालयातील आपल्या पहिल्या मोहिमेचे यशस्वी आयोजक ठरले आहेत. गोव्यातील तरुण साहसप्रेमींना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने जीएचएने या साहसी मोहिमेचे आयोजन केले होते. क्रीडा आणि साहस उपक्रमांना चालना देण्यासाठी जीएचएने गोवा राज्यातील ५०० जणांना हा अविस्मरणीय अनुभव घेण्याची संधी मिळवून दिली. यावर्षी एकूण ११ समूह एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान वेगवेगळ्या वेळेस या मोहिमेत सहभागी झाले.

हिमाचल प्रदेशात ट्रेकिंग करणे हे सर्वात साहसी काम समजले जाते. देशातील उंच पर्वतांच्या ट्रेकिंगमध्ये हिमालय सर्वात आघाडीवर आहे असे नक्कीच म्हणता येईल. हायकिंग करणाऱ्या लोकांमध्ये लोकप्रिय असलेल्या ठिकाणांमध्येइथल्या प्रसिद्ध ट्रेक्सपैकी किमान एक नक्की उद्युक्त करतो.

हायकिंग सहल बियास कुंडापासून सुरू झाली, जो मनालीमधील सर्वात प्रसिद्ध ट्रेक असून हिमाच्छदित पर्वतांनी वेढलेल्या हिमालयाच्या चौफेर दिसणाऱ्या विहंगम दृश्यास सोलांग दरीतून त्याची सुरुवात होते. दरम्यान काही ओढे, मृत ग्लेशियरवर हलके बांधण्यात आलेले खडक पार करून बर्फाच्छदित बियास कुंडापर्यंत जाता येते. या प्रदेशाच्या सर्व बाजूंनी हनुमान तिब्बासारख्या शिखरांचे सौंदर्य पाहाता येते.

समूहाचे नेतृत्व करत असलेले व्यावसायिक माउंटनियर  निखिल रावल यांनी वाटेत हिमालयीन प्रदेशातील सर्वोत्तम अनुभवांचे कथन केले.

ज्याप्रमाणे गोवा आपल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे, त्याप्रमाणे हिमाचल प्रदेश ट्रेकिंग, क्लायम्बिंग आणि स्कीईंगसाठी प्रसिद्ध आहे. सुदैवाने ट्रेकर्सना हिमाचल प्रदेशातील साहसासाठीचे सर्वात लोकप्रिय केंद्र असलेल्या सोलांग व्हॅलीमध्ये ट्रेक करता आला. स्नो व्हॅली नावानेही ओळखली जाणाऱ्या या व्हॅलीमध्ये स्कीईंग, पॅराशूटिंग, पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग आणि माउंटनेयरिंग असे हिवाळी साहस क्रीडा उपक्रम घेतले जातात. ही निसर्गरम्य व्हॅली मनालीतले सर्वात मनमोहक ठिकाण असून समुद्रसपाटीपासून २५६० मीटर्स उंचीवर आहे. ग्लेशियर्स आणि बर्फाच्छित शिखरे अशा दोन्ही प्रकारच्या निसर्गरम्य दृश्यांचा अनुभव इथे घेता असल्यामुळे हे पर्यटकांसाठी ट्रेकिंगचे आवडते ठिकाण आहे.

या हाइकमध्ये रॉक क्लायम्बिंग, रॅपलिंग, कॅम्प फायर अशा साहसी उपक्रमांचाही समावेश असतो.

प्रमोद कामत, अध्यक्ष, गोवा हायकिंग असोसिएशन म्हणाले, ‘हा आमचा पहिला खासगी ट्रेकिंग उपक्रम होता आणि यावर्षी त्याला मिळालेले यश पाहून मला खूप आनंद झाला आहे. आम्हाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आणि भविष्यामध्येही अशा प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. गोव्याच्या तरुणाईला उत्साहित करणे हा आमचा हेतू होता आणि केवळ अथक मेहनतीच्या जोरावर आम्ही हे यश मिळवले आहे. गेल्या ३५ वर्षांच्या कालावधीत गोवा हायकिंग असोसिएशनने असे उपक्रम यशस्वीपणे लोकप्रिय करत तरुणांना मानसिक व शारीरिक आरोग्याचे फायदे मिळवून दिले आहेत.’

 

मी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ गोवा, डिरेक्टर ऑफ स्पोर्ट्स अँड एक्झक्युटिव्ह एसएजी,  व्ही. एम. प्रभूदेसाई, क्रीडा विभाग आणि युथ अफेयर्स तसेच जीएचएच्या संपूर्ण टीमचेहा उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी दिलेल्या संपूर्ण पाठिंब्यासाठी आभारी मानतो.

या हायकिंग सहलीमध्ये सहभागी झालेल्या राधिका लोटलीकर म्हणाल्या, ‘हायकिंग करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता आणि तो अविस्मरणीय होता यात शंकाच नाही. यामुळे मला खूप उत्साही आणि नवसंजीवनी मिळाल्यासारखे वाटत आहेच, शिवाय त्यामुळे माझा आयुष्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक झाला. ही सहल अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित केल्याबद्दल मीजीएचएच्या संपूर्ण टीमचे कौतुक करते आणि आभारही मानते.’

या हायकिंग सहलीमध्ये सहभागी झालेले श्री. अमित परूळेकर म्हणाले, ‘हिमालयातील पिर्पजल आणि दौलतधर यांसारखी शिखरे अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अतिशय आनंदी आहे. मनाली हे हिमाचल प्रदेशातील सर्वोच्च पर्यटन स्थळ असून तिथे आम्हाला पर्वतात राहाण्याचा अविस्मरणीय अनुभव घेता आला. आम्ही खडकाळ प्रदेशातून ट्रेकिंग केले, जवळून वाहाणाऱ्या छोट्या नद्यांचे पाणी प्यायले आणि मनसोक्त हिमाच्छदित शिखरे पाहिली. त्याशिवाय घेण्यात आलेले उपक्रमही अतिशय थरारक व साहसी होते. पुढील वर्षीही जीएचएच्या मोहिमेत सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे.’

पावसाळ्यानंतर जीएचए थरारक ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन करणार आहे.