गोवा सीमन असोसिएशन ऑफ इंडियाने खलाशांच्या मुद्यावर वेधले केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे लक्ष

0
350

 

गोवा खबर:गोवा सीमन असोसिएशनचे अध्यक्ष फ्रँक व्हिएगास, कॅप्टन वेन्झी व्हिएगास, सचिव मायकल  बेनी डाकोस्टा आणि डिक्सन वाझ यांनी मंगळवारी केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा संरक्षण राज्यमंत्री  श्रीपाद येसो नाईक  यांची भेट घेऊन कोविड-19 च्या प्रकोपमुळे तातडीने क्रूझ लाइनर  व जहाजांवर जगभरात अडकलेल्या भारतीय खलाशांना  परत आणण्यास सांगितले. लॉकडाऊन वाढवल्यामुळे भारतीय खलाशांचे कुटुंबिय चिंताग्रस्त आहेत.

जी.एस.ए.आयने  सादर केलेल्या सविस्तर मागण्या खालीलप्रमाणे आहेत:

कंपन्या चार्टर फ्लाइट्स घेण्यास तयार आहेत आणि खलाशांसाठी ‘ग्रीन चॅनेल कॉरिडोर ’ बनविण्यास तयार आहेत. खलाशी भारतात उतरल्यावर त्यांच्या  कोविड-19  चाचण्या केल्या जातील, विलगीकरणही पाळले जाईल आणि सरकारने परवानगी दिल्यानंतर ‘मानक प्रक्रिया प्रणाली’चे (एसओपी) पालनही केली जाईल. इंडियन सीफेरर्सशी संबंधित इंडस्ट्रीतर्फे सादर करण्यात आलेल्या ‘एसओपी’ला चार्टर्ड फ्लाइट्सद्वारे परत भारतात आणण्यासाठी आणि भारतीय खलाशांना जहाजांमध्ये जाण्यास परवानगी देण्याची संघटनेने विनंती केली आहे.  यामुळे प्रवाशांची तसेच माल वाहतूक सुरू होऊन मानवजातीसाठी सेवा कायम राहील.

‘रॉयल कॅरिबियन इंटरनॅशनल’चे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  मायकल बेयले आपल्या पत्राद्वारे लिहितात, की भारतीय खलाशांना ‘एंथेम’ येथे स्थलांतर करण्यात येणार असून ते 9 मे रोजी गोवा येथे प्रयाण  करणे शक्य होईल. सर्व खलाशी 3 जून रोजी गोव्यात पोहोचेल. त्यानंतर त्यांना स्वत:च्या राज्यात जाण्यासाठी वाहतुकीच्या तपशीलांवर काम केले जाणार आहे.

वरिष्ठ उपाध्यक्ष, (एचआर) ‘ग्लोबल फ्लीट ऑपरेशन्स’चे सुसान कॉस्की यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे- आम्ही भारतीय खंडातील खलाशांना मॅजेस्टिक प्रिन्सेसकडे हस्तांतरित करण्याची योजना आखत असून ते गोवा आणि त्यानंतर मुंबईला जाऊ शकतील. एकदा मनिला उतरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आम्ही खलाशांना त्यांच्या राष्ट्रीयतेच्या आधारे बदलीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यावेळी, ‘युरोडम ’ 23 मे रोजी गोव्यात दाखल होणार आहे. त्यानंतर मनिलामधील काही जहाजे त्यांच्या इस्फीत स्थळामवर जाण्यासाठी तयार होतील.

‘सेलिब्रिटी क्रूझ’ यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे, की  भारतीय क्रू मेंबर्सची ‘सेलिब्रिटी इन्फीनीटी ’ जहाजात बदली करून येत्या दोन आठवड्यांत गोवाला जाण्यासाठी  रवाना होईल आणि ते जूनच्या  सुरुवातीला गोव्याला दाखल होतील.

‘सेव्हन सीज व्हॉयेजर ’ जहाज 9 मे रोजी 71 गोमंतक खलाशी घेऊन  मुंबईत दाखल होणार आहे