गोवा शिपयार्डला संरक्षण मंत्रालयाचे सर्वतोपरी सहकार्य- श्रीपाद नाईक

0
1852

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्र्यांकडून विविध प्रकल्पांचा आढावा

गोवा खबर:केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर श्रीपाद नाईक यांनी आज प्रथमच गोवा शिपयार्डला भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला.

गोवा शिपयार्डचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक कमांडर (निवृत्त) बी बी नागपाल यांच्याशी श्रीपाद नाईक यांनी विविध प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच नंतर झालेल्या एका कार्यक्रमात श्रीपाद नाईक यांच्या हस्ते सीजीओपीव्ही या जहाजाचा बांधणी शुभारंभ सोहळाही पार पडला.

संरक्षण मंत्रालयाकडून गोव्याच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच गोवा शिपयार्डला नेहमीच संरक्षण मंत्रालयाचा पाठिंबा राहिला आहे. गोवा शिपयार्डला केवळ संरक्षण मंत्रालयाकडून नाही तर श्रीलंका आणि रशियाकडूनही कंत्राट मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे, असे श्री नाईक म्हणाले.