गोवा व कर्नाटक संबंधांवर बैठकीत चर्चा

0
221

गोवा खबर : गोवा व कर्नाटकमधील सौहार्दपूर्ण संबंध सुधारण्याच्या दृष्टीने, शंकर गौडा पाटील या कर्नाटक सरकारच्या विशेष प्रतिनिधींनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो – पणजी येथे भेट घेतली. दोन्ही राज्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.

दोन्ही राज्यांच्या वृद्धी व विकासावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच, दोन्ही राज्यांमधील सौहार्दपूर्ण संबंध अधिक मजबूत करण्याविषयीही यावेळी चर्चा झाली.

दोन्ही राज्यांमध्ये आर्थिक व सामाजिक विकासाशी संबंधित असलेल्या सर्व मुद्यांवरील मैत्रीपूर्ण उपायांवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत समाधानी असल्याची माहिती शंकर गौडा पाटील यांनी दिली.

या बैठकीत म्हादई नदीशी संबंधित मुद्यांवरही चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी म्हादई व इतर विषयांवर झालेल्या चर्चेविषयी कर्नाटक सरकारला आपण कळवू असे गौडा पाटील यांनी सांगितले, असे माहिती व प्रसिद्धी खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.