गोवा वैध्यकीय महाविध्यालयात पीजी पदवी आणि पदविका वर्ग प्रवेश         

0
677

 गोवा खबर:ज्या पात्र उमेदवारांनी  भारतीय वैध्यकीय मंडळ, राज्य वैध्यकीय मंडळाकडे कायम नोंदणी केली आहे आणि ज्यानी २०२०-२१ साठी गोवा वैध्यकीय महाविध्यालयात पीजी पदवी आणि पदविका जागांसाठी ५० टक्के राज्य कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी नीट- पीजी २०२० ची परीक्षा दिली आहे त्यांच्याकडून गोवा वैध्यकीय महाविध्यालयाने अर्ज मागविले आहेत.

      ५ टक्के पीजी जागा दिव्यांगासाठी उपलब्ध आहेत. ९ मार्चपासून अर्जांचे वितरण करण्यात येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख  २० मार्च २०२० रोजी संध्या ५ वाजेपर्येत. २६ मार्च रोजी महाविध्यालयाच्या माहिती फलकावर तात्पूर्ती यादी मांडण्यात येईल तर ३० मार्च रोजी अंतिम यादी मांडण्यात येईल. १ एप्रिल रोजी काऊंसेलिंग आणि प्रवेश फेरी घेण्यात येईल. पहिल्या फेरीनंतर वर्गात सहभागी होण्याची अंतिम तारीख  १२ एप्रिल अशी आहे. २४ एप्रिल रोजी काऊंसेलिंग आणि प्रवेश फेरीची दुसरी फेरी घेण्यात येईल. दुसऱ्या फेरीनंतर वर्गात सहभागी होण्याची अंतिम तारीख  ३ मे अशी आहे. १ मे पासून अभ्यासक्रमास सुरवात होईल. मॉप अप फेरी ८ मे रोजी घेण्यात येईल. मॉप अप फेरीनंतर वर्गात सहभागी होण्याची अंतिम तारीख  १२ मे अशी आहे.

      अधिक माहिती बांबोळीतील गोवा वैध्यकीय महाविध्यालयाच्या माहिती फलकावर मांडण्यात आली आहे.