गोवा वैद्यकीय महाविद्यालयात 30 जागांची वाढ

0
1446

आर्थिक निकषावर आधारित आरक्षणांतर्गत देशभर वैद्यकीय जागांमध्ये वाढ

गोवा खबर:केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशभरात आर्थिक निकषावर आधारित आरक्षणांतर्गत 5200 जागा वाढवल्या आहेत. यात गोव्यासाठी 2019-20 या शैक्षणिक सत्रासाठी 30 जागा वाढवण्यात आल्या आहेत.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गासाठी दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री आश्विनीकुमार चौबे यांनी आज राज्यसभेत ही माहिती दिली.