गोवा विमानतळावर 48.50 लाख किंमतीचे सोने जप्त

0
701

गोवा खबर:गोवा विमानतळ कस्टम विभागाने आज मस्कतहून येणाऱ्या प्रवाशाकडून 48.50 लाख किंमतीचे सोने जप्त केले. मोसीन बेपारी नावाचा प्रवासी ओमन एअर विमानाने बुटाच्या तळव्यांमध्ये आणि विजारीच्या पट्ट्यात लपवून सोने आणत होता.

गोवा कस्टम विभागाचे अतिरिक्त आयुक्त जे.के.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त एन.जी.पटेल आणि दीपक गवई यांनी कारवाई करत सदर सोने जप्त केले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. एप्रिल 2019 पासून कस्टम विभागाने एकूण 60.58 लाख रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे.