गोवा विज्ञान केंद्राकडून योगदिनानिमित्त योगसत्र

0
455

गोवा खबर:गोवा विज्ञान केंद्राने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त 21 जून रोजी सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत योगसत्राचे आयोजन केले आहे. गोवा विज्ञान केंद्राच्या कर्मचारी आणि नागरिकांसाठी हे सत्र आयोजित करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना यात सहभागी व्हावयाचे आहेत्यांनी गोवा विज्ञान केंद्राच्या 0832-2463426 क्रमांकावर किंवाgscp.education@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा. योगसत्रानंतर सकाळी साडेदहा वाजता आसने या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन आरोग्यमहिला आणि बालकल्याण मंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी शिक्षण खात्याच्या सचिव श्रीमती निला मोहनन यांचीही उपस्थिती असणार आहे.