गोवा येथे रिलायन्स डिजीटलच्या पहिल्या स्टोअरचे उद्‍घाटन 

0
1071

 

उद्‍घाटनाच्या शुभप्रसंगी इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्टच्या विस्तृत श्रेणीवर ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स

 

 

गोवा खबर: रिलायन्स डिजीटल ही भारताची पहिल्या क्रमांकाची ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची शृंखला असून गोव्यातील अल्टो पोर्वोरिम येथे पहिले दालन लॉन्च करण्यात आले. या नवीन दालनाद्वारे ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध झाली आहे. जिथे त्यांना अनोखा खरेदी अनुभव तर मिळेल, शिवाय सर्वोत्तम विक्री-पश्चात साह्य उपलब्ध होईल. खरेदीचा अनुभव अधिक खास करण्यासाठी रिलायन्स डिजीटलने पहिल्या 100* ग्राहकांकरिता उद्‍घाटनाच्या निमित्ताने र्षक ऑफर्स आणल्या आहेत.

जे ग्राहक या दालनातून निवडक उत्पादनांची खरेदी करतील त्यांना एअर पॉड्सवर 50% सूट किंवा रु. 999*रुपयांत शार्प 32” (81 सेमी) एलईडी टीव्ही उपलब्ध होईल. त्याशिवाय, टेलिव्हिजनच्या खरेदीवर ग्राहकांना मोफत साऊंडबार जिंकता येईल. सर्व ऑफर्सना काही अटी आणि नियम लागू आहेत.

                                                                                       

याप्रसंगी बोलताना रिलायन्स डिजीटलचे चीफ एक्झिक्यूटीव्ह श्री. ब्रायन ब म्हणाले की, “आम्हाला गोव्यात पहिल्या दालनाचे उद्‍घाटन करताना अतिशय आनंद होतो आहे. ग्राहकांना आनंददायी खरेदी अनुभव तसेच दोषमुक्त विक्री-पश्चात सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे. गोव्यातील आमच्या ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची खरेदी करताना मजा येईल ही आशा आम्ही व्यक्त करतो.

रिलायन्स डिजीटलद्वारे 500 हून अधिक आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय ब्रँडची 2,000 पेक्षा अधिक उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणांच्या विस्तृत उत्पादन श्रेणीचा समावेश आहे. ज्यामध्ये अत्याधुनिक स्मार्टफोन्स, स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन्स, रेफ्रिजरेटर, होम थिएटरडिजीटल कॅमेरा, लॅपटॉपअन्य साहित्य तसेच इतर लहान इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश असेल.

“पर्सनलायजिंग टेक्नोलॉजी” हे रिलायन्स डिजीटलचे बोधवाक्य खऱ्या अर्थाने जपण्याचे रिलायन्स डिजीटलचे उद्दिष्ट आहे. ज्याद्वारे ग्राहकांना त्यांच्या पसंतीची तंत्रज्ञान उत्पादने किफायतशीर दरांत उपलब्ध होऊ शकतात. इझी इएमआयसारख्या अनेक वित्तीय साह्य पर्यायांसमवेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर धमाल डील्स देण्यात येत आहेत. ग्राहकांना त्यांच्या जीवनशैलीनुरूप सुयोग्य तंत्र उपलब्ध करून देण्याचे रिलायन्स डिजीटलचे लक्ष्य आहे.