गोवा मनोरंजन संस्थेतर्फे कासारवल्ली चित्रपट महोत्सव

0
949

गोवा मनोरंजन संस्थेतर्फे  18 ते 20 ऑगस्ट रोजी गिरीश कासारवल्ली पुरस्कार प्राप्त चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘घटश्रध्दा’ या चित्रपटाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे, अशी माहीती गोवा मनोरंजन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद तालक यांनी दिली.

पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहीती दिली यावेळी त्यांच्यासोबत सचिन ताटे, मृणाल वाळके, व रामनाथ रायकर उपस्थित होते.

महोत्सवात कन्नड भाषेतील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चार चित्रपट प्रदर्शित केले जाईल. महोत्सवाचे उद्घाटन 18 रोजी दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्याहस्ते सायं 6.30 वा करण्यात येईल. महोत्सवातील चारही दिवस गिरीश कासारवल्ली हे चर्चेसाठी उपस्थित असणार आहे. तसेच महोत्सवाच्या समारंभावेळी त्यांच्यातहस्ते 8व्या मराठी चित्रपट महोत्सवाचे पुरस्कार वितरीत करण्यात येईल. असे तालक यांनी पुढे सांगितले.

या महोत्सवात 19 रोजी सायं ‘द्विपा’ चित्रपट, 20 रोजी स. 11 वा. ‘हसीना’ व सायं 6.30 वा. ‘गुलाबी टॉकिज’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तसेच 17 रोजी सिनेफाईल सदस्यांसाठॅ कासारवल्ली दिग्दर्शीत ‘रायसिंग दि स्टेलिऑन ऑफ ए ड्रीम’ हा अतिरिक्त चित्रपट दाखविण्यात येईल.