गोवा बोर्डाचा बारावीचा निकाल 89.59 टक्के: यंदाही मुलींची बाजी

0
874

 

गोवा खबर:गोवा उच्च माध्यमिक शालांन्त मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९. ५९ टक्के लागला आहे. एकूण १६ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १५ हजार १८७  विद्यार्थी उत्तर्णी झाले आहेत.

गेल्यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये मुलींची टक्केवारी मुलांपेक्षा सहा टक्के अधिक होती. त्यामुळे यंदाही मुलींनीच परीक्षेत बाजी मारली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या निकालात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी   ८५. ५३  टक्के निकल लागला होता.

पर्वरी येथील मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत शालांन्त मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण सामंत निकाल जाहीर केला.

यंदा परीक्षेला एकूण ८ हजार ९६७  मुली तर ७ हजार ९८५ मुले बसले होते. परीक्षेत उत्तीर्ण मुलांचे प्रमाण ८६. ९१  टक्के तर मुलींची टक्केवारी ९१.९७ इतकी आहे.

गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही वाणिज्य शाखेचा निकाल सर्वाधिक म्‍हणजे ९१. ८६ टक्के लागला आहे. त्या खालोखाल  विज्ञान शाखेचा निकाल ९१. ७६ टक्के, कला शाखेचा निकाल ८७. ७३ टक्के, तर व्यावसायिक शाखेचा निकाल ८४. ४५  टक्के  लागला आहे.
वाणिज्य शाखेतील ५ हजार १७३ पैकी ४ हजार ७५२  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतील ४ हजार ८१९ पैकी ४ हजार ४२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेतील ४  हजार ११७ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ६१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर व्यावसायिक शाखेतील २ हजार ८४३  पैकी २ हजार ४०१  विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेत बसलेल्या ३ हजार ९३  विद्यार्थ्यांना क्रिडा गुण प्राप्त झाले होते. यातील ११४ विद्यार्थी क्रीडा गुणांनी  उत्तीर्ण झाले आहेत. क्रिडा गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ०.७५ टक्के इतकी आहे.

यावेळी शालांन्त मंडळाचे सचीव भगिरथ शेटये, उपसचिव भारत चोपडे आणि सहाय्यक सचिव ज्योत्स्ना सरिन उपस्थित होत्या.