गोवा दूरदर्शनच्या फोन इन कार्यक्रमात आज आयुषमंत्री

0
779

 

 

 

 

गोवा खबर:गोवा दूरदर्शनच्या साप्ताहिक फोन इन कार्यक्रमात आज बुधवार दि. ६ मार्च रोजी केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक हे असणार आहेत.

आयुष मंत्रालयाच्या केंद्रात असलेल्या व अन्य विविध योजना अशा सर्वसाधारण विषयांवर हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात दूरदर्शनचे प्रेक्षक व सर्वसाधारण जनतेने संध्याकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत आपले प्रश्न आयुषमंत्र्यांना विचारावेत व माहिती जाणून घ्यावी असे आवाहन आयुषमंत्र्यांच्या कार्यालयातून करण्यात आले आहे.