गोवा टुरिझमतर्फे पुन्हा रंगणार स्विमेथॉन 2017

0
1035

ओपन वॉटर स्विमिंगसाठी भारतातील अधिकृत निवड चाचणी,  कोलवा बीच येथे 3 रोजी आयोजन

गोवा : भारतातील वॉटर स्पोर्ट्समध्ये गोव्याचा पर्याय पहिला असावा, यासाठी आम्ही
सातत्याने प्रयत्नशील आहोत, गोवा टुरिझमने स्क्वेअर ऑफ स्पोर्ट्सच्या स्विमेथॉन 2017साठी अधिकृत पाठिंबा
जाहीर केला आहे – ही भारतातील प्रमुख ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीप आहे, तसेच ती दक्षिण गोव्यातील
कोलवा बीच येथे 3 डिसेंबर 2017 रोजी आयोजित करण्यात येत आहे, स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया
(एसएफआय) या मान्यताप्राप्त संस्थेकडून भारतातील ओपन वॉटर स्विमिंगसाठी राष्ट्रीय निवड चाचणी घेण्यात
येत आहे, याअंतर्गत 10 किमी आणि 5 किमी स्पर्धेतील पुरुष व महिला विजेते फिना वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि
एशियन गेम्स व कॉमनवेल्थ गेम्सासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 2018 सालासाठी भारताचे प्रतिनिधित्व
करतील. या कार्यक्रमासाठी विश्वासार्हता आणि अॅथलेटिक पराक्रम आवश्यक आहे, एशियन गेम्समधील
कांस्यपदक विजेता आणि अर्जुन पुरस्कार विजेता विरधवल खाडे या स्विमेथॉन 2017चे ब्रँड
अॅम्बेसिडर असेल.
राजेश काळे, उपसंचालक, पर्यटन विभाग, गोवा प्रशासन,  गणेश आर. तेली, सहाय्यक
संचालक, पर्यटन विभाग, गोवा प्रशासन; सईद अब्दुल माजिद, माननीय प्रमुख सचिव, गोवा
स्विमिंग असोसिएशन; तलाशा प्रभू, गोव्याच्या स्विमर चॅम्पियन; आशिष अगरवाल,
व्यवस्थापकीय संचालक, स्क्वेअर ऑफ स्पोर्ट्स;  बरून कुमार खान, एलआयसी ऑफ इंडिया
आणि  गिरीश बाबु, मणिपाल हॉस्पिटल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेची अधिकृत
घोषणा करण्यात आली.
भारतात ओपन वॉटर स्विमिंग एक क्रीडाप्रकार म्हणून उदयास यावा तसेच आपल्या देशातून या
प्रकारातील अस्सल प्रतिभा समोर यावी, हे स्विमेथॉनचे ध्येय आहे. स्विमेथॉन 2017
एसएफआयबरोबर संलग्नित असून, याद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्विमिर्सना

सुयोग्य स्पर्धा निर्माण केली जाणार आहे. स्विमेथॉनच्या अंतिम फेरीतील विजेते रशिया येथे
आयोजित केल्या जाणाऱ्या फिना वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि पोर्तुगालमधील सेतुबल येथील
ऑलिम्पिक क्वालिफायरमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील.

एलआयसी ऑफ इंडिया, मणिपाल हॉस्पिटल, स्पीडो लोनगुनहोस
बीच रिसॉर्ट, ब्लॅक पँथर, ब्राइट आउटडोअर, डी'सिंगर, अॅक्विव स्पोर्ट्स, तान, स्विम इंडिया आणि
इव्हेंट क्वीब्ज ए आयडियाज आदी आघाडीच्या ब्रँडनी स्विमेथॉन 2017 साठी हातमिळवणी केली
आहे, त्यांचे ध्येय मात्र एकच आङे, ओपन सी स्विमिंगला भारतात क्रीडा प्रकाराचे स्थान मिळवून
देणे.
ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेत स्विमर्सना वेगळ्या आव्हानांचा सामना करायचा असतो, यात लेन
लाइन नसतात, वॉल किंवा स्टार्टिंग ब्लॉक नसतात आणि या सगळ्यातून मार्ग काढत
जिंकण्यासाठी प्रयत्न करायचे असतात. अंदाज न करता येणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचाही स्पर्धेच्या
विजयावर परिणाम होत असतो. यंदा, स्विमेथॉनतर्फे भारतीय ओपन वॉटर स्विमिंगच्या
इतिहासात पहिल्यांदाच सर्वात जास्त रोख रकमेचे म्हणजेच 4,00,000 लाख रुपयांचे पारितोषिक
देण्यात येत आहे. 10 किमी आणि 5 किमीच्या स्पर्धेतील पुरुष आणि महिला अशा दोन्ही
विजेत्यांना अनुक्रमे 50,000 आणि 25,000 रुपये देण्यात येणार आहे. याशिवाय विजेत्यांना
स्पिडोसारख्या इतर ब्रँड्सची गिफ्ट हॅम्परही देण्यात येणार आहेत.
गोवा प्रशासनाच्या पर्यटनविभागाचे सहाय्यक संचालक श्री. गणेश आर. तेली म्हणाले की, “
इथल्या सुरेख समुद्रकिनाऱ्यामुळे गोवा हे पर्यटनातील लोकप्रिय ठिकाण आहे, तसेच अनेक
वर्षांपासून येथील स्पोर्ट्स पर्यटनाची लोकप्रियताही वाढत आहे, येथील किनाऱ्यांचा वापर त्यासाठी
केला जात आहे, आणि तरुण खेळाडूंसाठी ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धांमध्ये खेळणे यासाठी हे
उत्तम व्यासपीठ आहे. स्विमेथॉन हा वार्षिक कार्यक्रम झाला

असून, गोवा प्रशासन गेल्या तीन वर्षांपासून त्याला पाठिंबा देत आहे आणि 2017च्या भागातला
हा कार्यक्रम उत्साहवर्धक असणार आहे. गोवा पर्यटन विभागातर्फे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या
गोव्याच्या स्थानिक आणि निपुण स्विमर्सना प्रोत्साहन दिले जाणार आहे, रविवारी कोलवा बीचवर
होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे, आणि स्पर्धकांना प्रेरणा द्यावी यासाठी विशेष
आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विशेष प्रोत्साहन देताना पर्यटन विभागातर्फे वित्तीय
आणि अवित्तीय पाठिंबाही दिला जात आहे. सर्व स्पर्धकांनी उत्तम कामगिरी करावी ही आमची
इच्छा आहे.

स्क्वेअर ऑफ स्पोर्ट्स या ब्रँडला स्विमेथॉनचा सहावा भाग
स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाबरोबर संलग्नितपणे आयोजित केल्याचे सांगताना अतिशय आनंद
होत आहे. पर्यटन विभागाच्या प्राधिकरणाचे आम्ही मनःपूर्वक धन्यवाद मानतो – गोव्यातर्फे गेल्या
काही वर्षांमध्ये या स्पर्धेला भरघोस पाठिंबा मिळत आहे आणि या वर्षीही तो कायम आहे. ओपन
सी स्विमिंग ही एक अनोखी स्पर्धा आहे आणि ऑलिम्पिक गेम्समधील सर्वात नवी स्पर्धा
म्हणूनीही तिचा समावेश झालेला आहे. या स्पर्धेत नवा उत्साह आणण्याचा आणि याचवेळी उत्तम
स्विमर्सना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत
आहोत. देशाच्या दुर्गम भागात सक्षम पण दुर्लक्षित राहिलेले प्रतिभाव खेळाडू आहेत, त्यांना
प्रशिक्षणाची आणि नेतृत्वाची योग्य संधी दिली तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व
करू शकतील. याशिवाय मॅरेथॉनप्रमाणेच आम्ही नव्या वर्षाचा संकल्प म्हणूनही याची निर्मिती
करत आहोत आणि `थिंग्ज टू डू' बकेट लिस्टमध्ये थरारक खेळांकडे मोहीम म्हणून लक्ष केंद्रीत
करत आहोत. प्रशासनातर्फे या खेळाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे, वॉटर स्पोर्ट्सचे विशेष
ठिकाण होईल आणि स्विमेथॉन एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा म्हणून गणली जाईल, तो
दिवस फार दूर नाही. आम्ही गोव्याच्या पर्यटन विभागाचे आभार मानतो, याबरोबर एलआयसी
ऑफ इंडिया, स्पिडो, मणिपाल हॉस्पिटल, ब्लॅक पँथर, लाँगुनिहोस बीच रिसॉर्च, दृष्टी या

सर्वांचेच त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि संलग्निततेसाठी मनःपूर्वक आभार मानतो, '' असे
स्क्वेअर ऑफ स्पोर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक श्री. आशिष अगरवाल
म्हणाले.
“स्विमेथॉनचा भाग असणे ही अतिशय उत्तम बाब आहे, ही भारतातील सर्वात लोकप्रिय ओपन सी
स्विमिंग स्पर्धा आहे, आणि तिला भारतातील समुद्री स्विमर्सकडून भरघोस प्रतिसादही मिळतो
आहे. भारताच्या सर्वोत्तम स्विमर्सनी या वर्षीच्या स्पर्धेत सहभाग घेतला असून, स्विमेथॉनच्या
साहाय्याने लाँग डिस्टन्स स्विमिंगसाठी भारताला एक उत्तम नाव सापडेल, अशी आशा मला
वाटते. सर्व सहभागी स्विमर्सना मी शुभेच्छा देते, असे निपुण भारतीय स्विमर श्रीमती तलाशा
प्रभू म्हणाल्या.

या संलग्नितेबद्दल गोवा स्विमिंग असोसिएशनचे
प्रमुख सचिव सईद अब्दुल माजिद म्हणाले की, “स्विमेथॉन – या भारतातील प्रमुख
ओपन वॉटर स्विमिंग चॅम्पियनशीपसाठी कायमचे ठिकाण म्हणून गोव्याला संधी मिळणे, अतिशय
अभिमानास्पद आहे. गेल्या अनेक वर्षांपासून, या उपक्रमाने भारतातील अनेक स्विमिंगमधील
प्रतिभावानांना गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर आपल्या कौशल्यांची चाचणी घेण्याची संधी ओपन
सीद्वरे दिली आहे, आणि मला खात्री आहे की, या वर्षीही स्विमिंगमधील अनेक स्पर्धक या
स्पर्धेला उपस्थित राहतील.
एसएफआयकडून मिळालेल्या मान्यतेविषयी मुंबईतील पत्रकार परिषदेत, स्विमेथॉन, स्विमिंग
फेडरेशन ऑफ इंडियाचे तात्रिक समितीचे मयुर व्यास म्हणाले की, “आम्हाला `स्विमेथॉन'ला
स्क्वेअर ऑफ स्पोर्ट्सबरोबर संलग्नितपणे प्रोत्साहन देताना अतिशय़ आनंद होत आहे, या प्रकारचे
उपक्रम सखोल तज्ज्ञतेच्या साहाय्याने आयोजित केले जात आहेत. स्विमेथॉन ही स्पर्धा भारतीय
स्पर्धकांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे, या स्पर्धेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा
व्यक्तिमत्त्व घडण्यास आणि ओपन वॉटर स्विमिंग प्रकारात

भारताचे प्रतिनिधित्व करण्यास मदत होते. गोव्यात आयोजन करण्यात आलेली स्विमेथॉन
सातत्यपूर्ण प्रयत्नांनी अधिक मोठे आणि अधिक चांगले स्थान प्राप्त केले आहे, स्क्वेअर ऑफ
स्पोर्ट्स टीमने हे सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत, आणि यामुळेच कार्यक्रमाचे संवर्धन झाले आहे.
स्विमेथॉन हा खूपच चांगला उपक्रम आहे आणि महत्त्वाकांक्षी स्पर्धकांसाठी ही एक मोठी संधी
आहे, याबाबत मी सकारात्मक आहे. स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाला स्विमेथॉनने ओपन वॉटर
स्पर्धेत स्विमर्ससाठी सुयोग्य व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, त्याचा लाभ जास्तीत जास्त
स्विमर्सना घेता यावा असे वाटते, आणि यातूनच आंतरराष्ट्रीय ध्येये पूर्ण व्हावीत, असेही वाटत
आहे.
स्पर्धकांच्या सुरक्षतितेचा विस्तार म्हणून आयोजकांनी दृष्टीच्या प्रोफेशनल लाइफगार्ड सेवा घेतली
आहे. याशिवाय गरज पडल्यास तातडीच्या सेवेसाठी लाइफगार्डबरोबरच हायस्पीड जेमिनी बोटही
उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, स्विमिंग एक्सपर्ट प्रत्येक प्रकारांसाठी उपलब्ध असतील,
आणि जेट स्कीजही सज्ज असतील. ते ऑडिट आणि रिस्क मॅनेजमेंटसह स्विमेथॉनला मदत

करतील, शिवाय योजना करणे आणि कार्यक्रमादरम्यान
आणीबाणीच्या परिस्थितीत उपाययोजना राबवणे आदी कार्येही करतील. याशिवाय आयोजकांबरोबर
मणिपाल हॉस्पिटलची सेवाही संलग्नित असणार आहे, याद्वारे स्पर्धेच्या ठिकाणी वैद्यकीय
सुविधा आणि अॅम्ब्युलन्स सेवा उपलब्ध असेल, तसेच सुसज्ज बोटसह वैद्यकीय सेवाही पुरवल्या
जातील.
स्पर्धेसाठीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
 10 के स्विमेथॉन
o 14 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुष व महिला
 5 के स्विमेथॉन
o 14 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुष व महिला

 2.5 के स्विमेथॉन
o 14पेक्षा कमी वयोगटाची मुले व मुली
o 14 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुष व महिला
o 35पेक्षा जास्त वयोगटातील पुरुष व महिला
 1 के स्विमेथॉन
o 14पेक्षा कमी वयोगटाची मुले व मुली
o 14 पेक्षा जास्त वयोगटातील पुरुष व महिला
o 35पेक्षा जास्त वयोगटातील पुरुष व महिला
आशिष अगरवाल यांच्याबद्दल
मनापासून उद्योजक आणि उत्पादनांच्या विक्रीची आणि सेवांची आवड असणारे, आशिष
अगरवाल यांनी शालेय शिक्षण पूर्ण करण्यापूर्वीपासूनच स्टार्ट-अपला सुरुवात केली होती. त्यांनी
वयाच्या दहाव्या वर्षी पहिला उपक्रम राबवला – आपल्या स्थानिक भागात लोकप्रिय अशी
कम्युनिटी लायब्ररी सुरु केली, आणि येथूनच कॉर्पोरेट जीवन ते उद्योजकतेच्या प्रवासाचा पाया
घातला गेला. उद्योजक म्हणून नावारुपास येण्यापूर्वी, आशिष यांनी आयबीएम, एचसीएल,

एनएसई, आयटी आणि रिकोह यासारख्या आयटी जायंटबरोबर
विविध विक्रीप्रधान भूमिका निभावल्या आहेत, याशाय ग्राहक म्हणून तब्बल 500 कंपन्यांना
यशस्वीरीत्या सेवा दिली आहे. आशिय यांनी मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि
टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे, तसेच त्यांना आयटी क्षेत्राचा 15
वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे.
मोठ्या समूहांबरोबर काम करतानाच, चांगल्या व्यवसायासाठी उत्तम नियंत्रण वातावरण निर्माण
करणे आणि उत्तर कॉर्पोरेट सेवेसाठी नियंत्रण प्रस्थापित करणे गरजेचे आहे असा आशिष यांचा
विश्वास आहे, आणि त्यांनी याच स्टाइलमध्ये आतापर्यंत काम केले आहे. ऑल स्क्वेअर ऑफ
स्पोर्ट्समध्ये त्यांनी अशाच प्रकारच्या सेवांची अंमलबजावणी केलेली
आहे, यामुळे सेवा पुरवठा अधिक सक्षम झाला आहे आणि प्रकल्पांचे आउटकम अधिक
हेतुनिहाय झाले आहे, याचा कंपनीच्या कामगिरीवर व दीर्घकालीन धोरणांवर सकारात्मक
परिणाम घडून येणार आहे.
या सध्याच्या भूमिकेत, आशिष स्क्वेअर ऑफ स्पोर्ट्सला विविध फोरममध्ये सादर करतात,
शिवाय एक प्रवक्ते म्हणूनही उपस्थित राहतात, आणि कंपनीला विविध राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स असोसिएशन आणि फेडरेशन्ससह उत्तम प्रकारे भागादारीसाठी सादर
करतात.
स्क्वेअर ऑफ स्पोर्ट्सबद्दल
स्क्वेअर ऑफ स्पोर्ट्स ही व्यवस्थापन, समुपदेशन आणि प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था आहे,
याद्वारे क्रीडा क्षेत्रात विस्तारीत सेवा दिल्या जातात. स्क्वेअर ऑफ स्पोर्ट्स ही एक चेंज एजंट
म्हणून प्रस्थापित कऱण्यात आलेली संस्था आहे – तिचे ध्येय म्हणजे भारताच्या क्रीडा
संस्कृतीचा विकास करणे, यासाठी आपल्या देशातील तरुणांना खेळ `वे ऑफ लाइफ' म्हणून
निवडण्यास प्रोत्साहित करणे हे आहे. भारतातील खेळ हे व्यावसायिक स्तरावर करणे या
दृष्टीकोनासह, स्क्वेअर ऑफ स्पोर्ट्स नमुन्यादाखल शिफ्टची निर्मिती करणे आणि तरुणांना
त्यांच्या लहान वयापासून खेळाची आवड निर्माण करण्यास प्रोत्साहन देणे हे ध्येय बाळगून आहे,
अशी आवड निर्माण झाल्यास मुले त्यांच्या करिअरचा पर्याय म्हणून खेळांचा गंभीरतेने विचार
करू शकतील, यासाठी त्यांनी क्रीडा प्रशिक्षण आणि शिक्षण तसेच क्रीडा व्यवस्थापनाचे धडे

देण्यात येतील. पोदार इंटरनॅशनल स्कूल, बिलाबाँग हाय
इंटरनॅशनल स्कूल, ठाणे, एसएम शेट्टी इंटरनॅशनल स्कूल, हिरानंदानी ग्रूप इत्यादी प्रमुख
क्लायंटपर्यंत हा उपक्रम यशस्वीरीत्या पोचला आहे.
खेळाचे प्रशिक्षण आणि शिक्षण
 के-12 स्पोर्ट्स एज्युकेशन
 शालेय क्रीडेशिवाय प्रशिक्षण आणि सुट्टीतील शिबिरे

 क्लबहाउस स्पोर्ट्स आणि कॉम्प्लेक्ससाठी सक्रिय आउटसोर्सिंग
 अकादमी आणि शालेय टीम ट्रेनिंगसाठी स्पर्धात्मक क्रीडा प्रशिक्षण
 शालेय क्रीडा टुर्स
खेळाचे व्यवस्थापन
 स्पोर्ट्स इंटलएक्च्युअल प्रॉपर्टीजची निर्मिती व संपादन
 स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट आणि पब्लिक रिलेशन
 कॉर्पोरेट एम्प्लॉई एंगेजमेंट
 कम्युनिटी स्पोर्ट्स इव्हेंट