गोवा टुरिझमतर्फे किंग मोमो निवडण्यासाठी प्रवेशिका देण्याचे आवाहन

0
869

 

पणजी : गोव्यातील लोक कार्निवल 2018ची आतुरतेने वाट पाहात आहेत, 10
फेब्रुवारीपासून या उत्सवाला जोमदार सुरुवात होत असून, 13 फेब्रुवारी 2018 पर्यंत उत्सव
चालणार आहे.
याच उत्साहाच्या काळात राज्यात आनंदाला उधाण आलेले असते आणि राज्याचा हा आनंददायी
असा वार्षिक उत्सव आहे.
कार्निवल समितीसह गोवा टुरिझमने, मोठ्या मनाच्या, आनंद वाटून घेणाऱ्या आणि धमाल-मस्ती आवडणाऱ्या
गोवेकरांना राज्याच्या गोवा कार्निवल 2018 उत्सवाच्या किंग मोमोसाठी प्रवेशिका देण्याचे आमंत्रण दिले आहे.
गोव्यात कार्निवल रंगलेला असताना, चार दिवसीय उत्सवात किंग मोमो स्पर्धा मध्यवर्ती असेल. प्रवेशिका
सादर करू इच्छिणाऱ्यांना पूर्ण लांबीचा फोटो आणि एक क्लोज-अप फोटो आपल्या नाव, पत्ता व संपर्क
तपशील व इतर सर्व माहितीसह सादर करण्याचे आवाहन कऱण्यात आले आहे.
यासाठीचे प्रवेश अर्ज डीओटीच्या www.goatourism.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध असतील.
प्रवेशाची अंतिम तारीख 25 जानेवारी 2018 आहे. कार्निवल 2018च्या किंग मोमोसाठी 30 जानेवारी 2018
पर्यंत निवड केली जाईल.
तर तुमच्यापैकी कुणाला पुढचा किंग मोमो व्हायचंय? चला तर मग तुमच्या प्रवेशिका भरा आणि या
उत्साहवर्धक स्पर्धेत सहभागी व्हा.