गोवा टपाल सेवा स्थापनेची 180 वर्षे पूर्ण

0
239

 

 

 

गोवा खबर:जागतिक टपाल दिनानिमित्त आणि गोवा टपाल विभागाच्यावतीने गोव्यातल्या टपाल सेवा स्थापनेला 180 वर्षे झाली यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. या पाकिटावर ‘‘गोव्यातील टपाल सेवा स्थापनेची 180 वर्षे’’ अशी मुद्रा उठविण्यात आली आहे. तसेच यावेळी ‘बॅसिलिका ऑफ बॉम जिझस’’ च्या चित्रांकनाचे कायमस्वरूपी कार्ड आज प्रकाशित करण्यात आले.

या कार्यक्रमाला गोवा विभाग, पणजीचे पोस्टमास्तर जनरल, डॉ. एन. विनोदकुमार, वरिष्ठ सुपरीडेंट डॉ. सुधीर जी जाखेरे, गोवा फिलाटेलिक आणि नुमिस्मॅटिक संस्थेचे (जीपीएसएस) अध्यक्ष डॉ. एम.आर. रमेशकुमार, आणि चिटणीस अस्लेश कामत उपस्थित होते. पणजी येथे टपाल भवनामध्ये झालेल्या या कार्यक्रमाला टपाल कार्यालयातले अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

आज प्रकाशित करण्यात आलेले विशेष पाकिट पणजीच्या मुख्य टपाल कार्यालयामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. यावर तांब्याची मुद्रा असून त्याची किंमत प्रत्येकी 30 रूपये आहे. 

‘बॅसिलिका ऑफ बॉम जिझस’’च्या चित्रांकनाचे कार्डसंच वेल्हा गोवा टपाल कार्यालयामध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. 

पणजी मुख्य टपाल कार्यालयामध्ये ‘बॅसिलिका ऑफ बॉम जिझस’’ चित्रांकनाचे कार्ड विक्रीसाठी उपलब्ध आहे. या संचामध्ये सहा कार्डांचा समावेश आहे. त्याचे प्रत्येकी मूल्य 180 रूपये आहे.