गोवा टपाल विभागात विमा एजंट पदासाठी थेट मुलाखती

0
406

 

गोवा खबर:टपाल जीवन विमा/ ग्रामीण टपाल जीवन विमा यासाठी थेट एजंटसच्या भरती प्रक्रियेकरिता गोव्याचा टपाल विभाग मुलाखती घेणार आहे. या मुलाखती 22 ते 24 जुलै 2020 या काळात टपाल भवन, इडिसी कॉम्प्लेक्स, पाटो, पणजी येथे सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत होणार आहेत.

 

आवश्यक पात्रता:

1. शिक्षण: 5 हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या क्षेत्रातील उमेदवार 10वी पास असावा, व 5 हजार किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या असलेल्या भागातील उमेदवार 12वी पास असावा.

 

2. वय: 18 ते 60 वर्षे

 

3. वर्गवारी: कोणत्याही विमा कंपनीचे माजी जीवन सल्लागार/एजंट, अंगणवाडी सेविका, महिला मंडळ कार्यकर्त्या, स्वयं सहायता गट, माजी नोकरदार, निवृत्त शिक्षिका, बेरोजगार/स्वयं रोजगार करणारा युवा वर्ग किंवा वरील पात्रता निकष पूर्ण करणारी कोणतीही व्यक्ती.

4. इष्ट: विमा योजना विक्रीचा अनुभव, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाचे ज्ञान.

 

5. उमेदवारांनी आपली व्यावसायिक माहिती (बायोडेटा), वयाचा पुरावा, शैक्षणिक कागदपत्रे, असल्यास अनुभव प्रमाणपत्रे, मुलाखतीसाठी येताना सोबत आणावीत.

 

वरिष्ठ निरीक्षक, टपाल कार्यालय, गोवा विभाग, पणजी यांच्या कार्यालयातून हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.