गोवा टपालविभागाकडून जनतेमध्ये प्लाझ्मा दान करण्याविषयी जागृती

0
419

गोवा खबर:गोवा टपाल विभागाकडून सध्या सुरु असलेल्या कोविड-19 संक्रमणाविरोधात लढण्यासाठी  जनतेमध्ये प्लाझ्मा दान करण्याविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून ‘कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्मा थेरपी’ निमित्ताने 07 सप्टेंबर 2020 रोजी विशेष कव्हर आणि विशेष टपालतिकीटाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

या विशेष कव्हर आणि विशेष टपालतिकीटाचे पुरस्कर्ते गोवा फिलेटेलिक आणि न्यूमिझमॅटिक सोसायटी आहेत. विशेष कव्हर आणि विशेष टपालतिकीट कोविड-19 मधून पूर्ण बरे झालेल्या नागरिकांनी कोविडचे उच्चाटन करण्यासाठी प्लाझ्मा दान करण्याची आवश्यकता आहे, हे अधोरेखित करते.

 

या विशेष कव्हर आणि टपालतिकीटाच्या माध्यमातून सामान्यांमध्ये योग्य तो संदेश पोहचावा, अशी टपालखात्याने आशा व्यक्त केली आहे.