गोवा खबर डॉट कॉमचे पर्रिकरांच्या हस्ते लॉन्चिंग

0
3685

पणजी:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियाच्या आवाहनाला प्रतिसाद देत वालावलकर पब्लिकेशनतर्फे सुरु करण्यात आलेल्या गोवा खबर डॉट कॉम या न्यूज पोर्टलचे लॉन्चिंग मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी उपसभापती मायकल लोबो,पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर उपस्थित होते.पर्रिकर यांनी गोवा खबर डॉट कॉमची माहिती घेऊन गोवा खबर डॉट कॉमला शुभेच्छा दिल्या.
गोवा खबर डॉट कॉम मधून देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेतला जाणार असून दिवसभरात घडणाऱ्या घटनांना तात्काळ प्रसिद्धि दिली जाणार आहे.
डिजिटल युगात स्वतःच्या हिम्मतीवर धडपड़ करतात त्यांना डिजिटल व्यसपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.बातम्यांबरोबर सर्वसामांन्यांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा गोवा खबर डॉट कॉमचा मुख्य उद्देश आहे.