गोवा क्रांतीदिनानिमित्त हुतात्म्यांना श्रध्दाजंली

0
71

 

गोवा खबर:राज्यपाल भगत सिंग कोश्यारी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोवा क्रांतीदिनी आझाद मैदानावर आयोजित कार्यक्रमात हुतात्मा स्मारकांवर पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहिली.

यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक, मुख्य सचिव, परीमल राय, आयएएस, मुख्य निवडणूक अधिकारी, श्री. कुणाल, आयएएस, माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे सचिव श्री. संजय कुमार, आयएएस, पोलिस महानिरीक्षक, सरकारी सचिव आणि इतर वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम सामाजिक अंतराच्या सर्व नियमांचे पालन करून आणि सामान्य लोकांसाठी खुला न ठेवता आयोजित करण्यात आला होता.

स्वातंत्र्य सैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्यातील लोकांना परकीय राजवटीविरुध्द लढा देऊन गोव्याला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त करण्यासाठी केलेल्या आवाहनाची आठवण म्हणून दरवर्षी १८ जून रोजी क्रांती दिवस साजरा केला जातो. या आवाहनामुळे बर्‍याच गोमंतकीयांना परकीय सत्तेविरूध्द लढण्याची प्रेरणा मिळाली ज्यामुळे १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा परकीय राजवटीतून मुक्त झाला. या दिवशी गोव्याच्या स्वातंत्र्य चळवळीतील ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांच्या शौर्य आणि त्यागांचेही स्मरण करण्यात येते.