गोवा ओपिनियन पोल दिवस मगो सोबत साजरा करण्याचा सरकारला हक्क नाही

0
1270
ज्या दिग्गजांनी गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी प्रयत्न केले त्यांना गोवा शिवसेना अभिवादन करते. परंतु गोवा ओपिनियन पोल दिवसा आडून गोवा फॉरवर्ड पक्ष मात्र या दिवसाचा राजकीय फायदा उचलू इच्छिते हे लक्षात घ्यायला हवे. त्यांनी या  दिवसाचे औचित्य साधून मडगाव येथे आज सभेचे आयोजन केले आहे. या ऐतिहासिक दिवसाचा राजकीय फायदा उचलणे हा एकमेव उद्देश या सभेमागे आहे. या इतिहासाचा अभ्यास शालेय अभ्यासक्रमात असावा या त्यांच्या मागणीचे आम्ही पूर्णपणे समर्थन करतो, परंतु विजय सरदेसाई नेतृत्व करीत असलेल्या या पक्षाची दुहेरी भूमिकाही लक्षात घ्यायला हवी. गोवा फॉरवर्ड पक्ष जर गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी लढलेल्या थोरांचा आदर करतो, गोव्याच्या संस्कृतीचा आदर करतो तर त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष सामील असलेल्या सरकारमध्ये राहणे जराही उचित नाही. गोव्याला महाराष्ट्रात विलीन करण्याची भूमिका घेतलेला मगोप पक्ष आज पर्रीकरांसोबत सरकारमध्ये बसला आहे. गोवा ओपिनियन पोल दिवसाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी करणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षाने आणि सरदेसाई यांनी  प्रथम स्वतःची तत्व निश्चित करायला हवीत. जर त्याचे विचार मगोप सोबत जुळत नाहीत तर ते एकत्र सरकारमध्ये बसूच कसे शकतात. तसेच गोव्याला दिल्ली दरबारी आणि शेजारील राज्यांकडे  विकू पाहणाऱ्या प्रस्थापित सरकारला गोवा ओपिनियन पोल दिवस साजरा करण्याचा जराही हक्क नाही. म्हादई नदी प्रश्नावरून सरळ दिसून येते कि दिल्लीच्या दबावामुळे गोव्याला कर्नाटकास विकण्याचा डाव सरकार करीत आहे. दिल्लीच्या नेत्यांना हे सरकार विकले गेले आहे. त्यांच्या अशा दुहेरी भूमिका म्हणजे गव्याच्या अस्तित्वासाठी लढलेल्यांचा घोर अपमानच आहे. गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्वाचा शिवसेनेला अभिमान आहे. गोयंकरांची शिवसेना हे गोव्याच्या उन्नतीकरिता स्वतंत्र विचारधारा असणाऱ्या व्यक्तींकरिता एक मोकळे व्यासपीठ आहे. गोव्याचे टूकडे करू इच्छिणारी भाजपा सोबत बसलेल्या  मगोप आणि गोवा फॉरवर्ड सारख्या पक्षांना या पवित्र दिवसाचा राजकीय फायदा घेण्याचा मुळीच हक्क नाही.
राखी नाईक प्रभुदेसाई
प्रवक्ता – गोवा शिवसेना