गोवा उच्च माध्यमिक मंडळाची पुरवणी परिक्षा ७ जून पासून

0
552

 गोवा खबर:सुधारणेची आवश्यकता असा शेरा/गुणांमध्ये सुधारणा पाहिजे अशा विद्यार्थ्यांसाठी बारावी जून २०१९ परीक्षा ७ जून ते १४ जून पर्यंत गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, आल्त बेती यांच्याकडून घेण्यात येणार आहे. बारावी जून २०१९ परीक्षा संबधिच्या तारखांची यादी मंडळाच्या www.gbshse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल.

सदर परिक्षा दोन सत्रात होणार आहे सकाळी ९.३० वा. पासून आणि दुपारी २.३० वा. पासून सर्व श्रेणीसाठी. सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की त्यांनी आपल्या संबधित परिक्षा केंद्रावर परिक्षा सुरू होण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर पोचावे.

परिक्षा दोन केंद्रावर घेण्यात येईल. म्हापसा-एस.एम. खुशे उच्च माध्यमिक विद्यालय, आसगांव, बार्देश आणि मडगांव-कार्मेल उच्च माध्यमिक विद्यालय, नुवे, सासष्टी.

बारावी जून २०१९ परीक्षेसाठी १८०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. (मुले १०९४ आणि मुली ७०६)

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संबधित परिक्षा केंद्रावर समन्वयक/निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा.

म्हापसा केंद्रावरील समन्वयक श्री. रूईल्डो सोझा, डी. एम. एस. उच्च माध्यमिक विद्यालय, आसगांव, म्हापसा गोवा. (एचएस-११) कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक -२२६८६७२ आणि मोबा. ९८२२१६१०५९. निरीक्षक-श्रीमती मारीया गोर्राटे आफान्सो, सेंट झेवियर हायस्कूल, मयडे बार्देश, (०१.०७) कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक-२४७०१७९ आणि मोबा. ७७९८५९६६७८. मडगांव केंद्रावरील समन्वयक तनुजा सरदेसाई, कार्मेल उच्च माध्यमिक विद्यालय, नुवे, सासष्टी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक-२७९०६२५ आणि मोबा. ९४२११५२८५२. निरीक्षक-कोर्नाद सी. मेंडीस, फा. आग्नेल मल्टीपर्पज हायस्कूल, आग्नेलवाडा, वेर्णा, सासष्टी (०८.६०) कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक-२७९१२०९ आणि मोबा. ९८२२१२१२०३