गोवा इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाखालील लाभ

0
85

गोवा खबर : गोवा इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाने इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रांतील लाभधारक कामगारांची नोंदणी प्रक्रिया पुन्हा चालू करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रांतील कामगारांनी लाभधारक म्हणून मंडळाकडे नोंदणी केली पाहिजे.

लाभधारक म्हणून मंडळाकडे नोंदणी करण्यासाठी प्रत्येक कामगाराने वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी. परंतु ६० वर्षे पूर्ण केलेली नसावी. कोणत्याही  इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रांत मागील बारा महिन्यांच्या काळांत ९० दिवस किंवा जास्त दिवस काम केलेला कामगार लाभधारक म्हणून नोंदणी करण्यास पात्र आहे.

नोंदणीसाठी कामगार निरीक्षकाने दिलेला अर्ज, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, मालक किंवा कंत्राटदार किंवा नोंदणीकृत संघटना किंवा क्रेडाई किंवा कंत्राटदार संघटना किंवा बिल्डराचा दाखला, वयाच्या दाखल्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, जन्म दाखला, वाहन चालविण्याचा परवाना, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड, नॉमीनीचे नाव, आधार कार्ड नंबर आणि नाते, बांधकाम कामगाराच्या बँक पासबुकाच्या पहिल्या पानाची फोटोकॉपी आणि आधारकार्ड आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी विनय एन. नाईक, प्रशासकीय/ नोंदणी अधिकारी किंवा मेलबा पेरेरा, सहाय्यक प्रशासकीय/ नोंदणी अधिकारी, फोन क्र. ०८३२- २४३७०८१, गोवा इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, कामगार आयुक्त कार्यालय, दुसरा मजला, श्रमशक्ती भवन, पाटो-पणजी यांच्याकडे संपर्क साधावा.