गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ( गोवा व्यवस्थापन संस्था ) ला जागतिक बिझनेस स्कुल क्रमवारीत चौथे स्थान

0
288

 संयुक्त राष्ट्रांची सकारात्मक परिणाम क्रमवारी २०२१

 

गोवा खबर:संयुक्त राष्ट्रांच्या जबाबदार व्यवस्थापन शिक्षण तत्वे कार्यक्रमाअंतर्गत (UN-PRME)सकारात्मक परिणाम क्रमवारीत (पोसिटीव्ही इम्पॅक्ट रेटिंग्ज- पीआयआर )गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला ( जीआयएम )चौथे स्थान मिळाले. यामुळे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला त्यांच्या सामाजिक परिणाम आणि शाश्वत विकासाच्या कामासाठी संयुक्त राष्ट्रांकडून मान्यता मिळाली आहे. न्यू यॉर्क, युएसए येथून व्हर्चुअल पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

 

या क्रमवारीसाठी यावर्षी जगभरातून २१ देशातील ४६ बिझनेस स्कुलनी सहभाग घेतला होता. या क्रमवारीत जगभरातून केवळ चार संस्थानी अग्रस्थान पटकावले. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसह अन्य दोन संस्था भारतीय आहेत.

 

 संयुक्त राष्ट्रांच्या जबाबदार व्यवस्थापन शिक्षण तत्वे कार्यक्रमाअंतर्गत (UN-PRME)सकारात्मक परिणाम क्रमवारीत गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला चौथे स्थान मिळाले. यामुळे गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला त्यांच्या सामाजिक परिणाम आणि शाश्वत विकासाच्या कामासाठी संयुक्त राष्ट्रांकडून मान्यता मिळाली आहे. न्यू यॉर्क, युएसए येथून व्हर्चुअल पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.

 

या क्रमवारीसाठी यावर्षी जगभरातून २१ देशातील ४६ बिझनेस स्कुलनी सहभाग घेतला होता. या क्रमवारीत  केवळ चार संस्थानी पाचवा स्तर गाठत अग्रस्थान पटकावले. यातील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसह अन्य दोन संस्था भारतीय आहेत.

नुकतीच सकारात्मक परिणाम क्रमवारी संस्थेचे प्राध्यापक थॉमस डायलिक आणि ओकीऑस इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षा सोफी चॅरिओस यांनी ४६ संस्थांच्या सामाजिक परिणाम क्रमवारीची घोषणा केली.

 

भारतातील गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट , एस पी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च आणि झेवीयर स्कुल ऑफ मॅनेजमेंट अँड दि युनिव्हर्सिटी ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजी ,कोसोवो यांनी सकारात्मक परिणाम क्रमवारीत अग्रणी संस्था होण्याचा मान मिळवला. अभिनव आणि  समुदाय आधारित कृती, पर्यावरणीय आणि सामाजिकदृष्ट्या जबाबदार असणारी कार्य संस्कृती व  जबाबदार नेतृत्त्व तयार करण्यासाठी करण्यात आलेले  अध्यापन या सर्व गोष्टींमुळे या संस्थांना ही उपलब्धी साध्य करता आली.

 

सकारात्मक क्रमवारी ही विद्यार्थ्यांकडून विध्यार्थ्यांसाठी घेतली जाते. जगभरातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या बिझनेस स्कुलचे मूल्यांकन केले तसेच त्यांनी जगात केलेला सकारात्मक परिणाम विद्यार्थी कसे पाहतात हेही दुसऱ्यांदा तपासले.

 

गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी संस्थेने सामाजिक आणि शाश्वत प्रश्नांना तोंड देत त्यांच्या विद्यार्थ्यांना जबाबदार बिझनेस लीडर बनविण्यासाठी कसे तयार केले याबाबत मूल्यांकन केले. या सर्वेक्षणासाठी माहिती गोळा करणे आणि ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम संस्थेच्या विद्यार्थ्यांनीच केले. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने प्रथमच या सर्वेक्षनात भाग घेतला होता. संस्थेच्या एकूण १५१ विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता. यासाठी आशिमा माथूर,अमेय अंबिके, जेसीका रॉय आणि शिवानी भाटीया या विद्यार्थ्यांनी विशेष कार्य केले.

 

सकारात्मक परिणाम क्रमवारीत सहभागी होणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या आवाजाला आणि मतांना मान देणे होय. याबाबत बोलताना गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक अजित परुळेकर म्हणतात की सकारात्मक परिणाम क्रमवारी ही जगभारत कोणती बिझनेस स्कुल चांगली आहेत याची माहिती देत नाही तर जगासाठी कोणती बिझनेस स्कुल चांगली आहेत याची माहिती देते.

२०२१ च्या सकारात्मक परिणाम क्रमवारीत जगभरात बदलासाठी काम करणाऱ्या चार अग्रणी संस्थामध्ये आमची संस्थाही आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो.

भविष्यातील शाश्वत व्यवसायासाठी नेते तयार करण्याच्या आपल्या कार्यासाठी जीआयएम नेहमीच अग्रेसर राहिले आहे. नीतिशास्त्र, मूल्ये आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे आमच्या अध्यापनशास्त्राचे मूळ केंद्र आहे. पीआयआर हा जगभरातील विद्यार्थ्यांचा आवाज आहे आणि आमच्यासाठी सर्वात समाधानकारक गोष्ट म्हणजे आमचे मुख्य भागधारक – आमच्या विद्यार्थ्यांनी संस्थेच्या शाश्वतता, जबाबदारी आणि परिणामाच्या प्रति संस्थेच्या असलेल्या प्रतिबद्धतेला मान्यता देऊन आम्हाला प्रोत्साहित केले आहे.

 

सकारात्मक परिणाम क्रमावरी संस्थेचे प्राध्यापक डायलिक म्हणतात की बिझनेस स्कुलची क्रमवारी ही शाश्वततेच्या प्रश्नांपासून दूरच असते. मात्र सकारात्मक परिणाम क्रमवारी  मुळे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने विचार करून स्कुलना आपले विचार बदलण्यात मदत करते.

 

सकारात्मक परिणाम क्रमवारी ही जगातील पहिली क्रमवारी आहे जेथे विद्यार्थी आपल्या बिझनेस स्कुलचे सकारात्मक परिणामवर मूल्यांकन करतात. ओकीऑस इंटरनॅशनल संस्थेच्या अध्यक्षा आणि सकारात्मक परिणाम क्रमवारीच्या निरीक्षण समितीच्या सदस्या सोफी चॅरिओस म्हणतात की जगभरात जास्तीत जास्त विद्यार्थी त्यांना भविष्यातील नेते बनवतील आणि बदलाचे प्रतिनिधी बनवतील अशा प्रकारच्या शिक्षण पद्धतीला प्राधान्य देतात.

ओकीऑस इंटरनॅशनल हे सकारात्मक परिणाम क्रमवारीचा भाग आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. आम्ही त्यांना जागतिक पातळीवर स्कुलच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यात मदत करतो.

 

भल्या गोष्टीसाठी व्यवसाय हे बळ ठरू शकते आणि व्यवसायाच्या पुढील पिढीतील विद्यार्थ्यांद्वारे हे दृढ केले जाते. जबाबदार व्यवस्थापन शिक्षणास प्राधान्य देण्यासाठी पीआयआर व्यावसायिक शाळांना समर्थन देते – यूएन ग्लोबल कॉम्पॅक्ट आणि पीआरएमई तत्त्वे या महत्वाकांक्षांचे  समर्थन करतात. असे मत संयुक्त राष्ट्रांच्या ग्लोबल इम्पॅक्टचे कार्यकारी संचालक अंटोनियो होऊटले यांनी व्यक्त केले आहे.

या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांना उत्साहीपणा, शिक्षण आणि व्यस्त राहण्याबाबतच्या सात परिणामकारक क्षेत्राविषयी वीस प्रश्न विचारण्यात आले. बिझनेस स्कुलची त्यांच्या एकूण पीआयआर गुणांनुसार पाच स्तरात विभागणी केली गेली.

पीआयआर स्तर परिभाषित करण्यासाठी १० पॉईंट  स्केलवरील पातळीचे कमी होत असलेले आकार वापरून  केल्या होत्या. उच्च पातळीवर पोहोचण्यासाठी वाढते आव्हान व्यक्त करण्यासाठी वापरण्यात आल्या. यानुसार जीआयएमला १० पॉईंट स्केल पैकी ९ गुण मिळाले . वेगवेगळे स्तर व्यवसाय शाळेच्या विकासाच्या अवस्थेचा उल्लेख करतात आणि त्या विशिष्ट स्तरावरील कृतीद्वारे क्रमवारी ठरवतात. व्यवसाय शाळा परिभाषित सामाजिक प्रभाव आणि ते बदलण्यासाठी वापरू शकतील असे साधन प्रदान करतात.

 

सकारात्मक परिणाम क्रमवारी असोसिएशनचे अध्यक्ष कॅट्रिन मफ म्हणाले “पीआयआर हे व्यवसाय शिक्षणामध्ये सुधारणा आणि परिवर्तन घडविण्याचे साधन आहे. ही क्रमवारी विद्यार्थ्यांचा विचार करून समाजासाठी सकारात्मक परिणाम काय आहे हे समजून घेण्यास  शाळांना सक्षम करते. अग्रगण्य शाळांमध्येही पीआयआर सुधारणेच्या संभाव्यतेवर प्रकाश टाकते. ”

 

बिझिनेस स्कूल तज्ञ, जागतिक स्वयंसेवी संस्था ,डब्ल्यूडब्ल्यूएफ, ऑक्सफॅम आणि यूएन ग्लोबल कॉम्पॅक्ट यांनी मिळून पीआयआर बनवली आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संघटना ओईकोस, एआयईएसईसी आणि नेट इम्पॅक्ट हेदेखील पीआयआरचा भाग आहेत, ज्यास व्हिवा आयडिया आणि फेहर अ‍ॅडव्हाइस यांचेही सहकार्य आहे.

 

यातील उल्लेखनीय भाग असा की यामध्ये सहभाग घेणाऱ्या जगभरातील शाळांनी पीआरएमइ (एसआयपी अहवाल), इक्विस (स्वयं मूल्यांकन अहवाल) किंवा एएसीएसबी (स्वयं-मूल्यांकन) या बाबींकडे त्यांच्या प्रगती आणि सामाजिक परिणामाबद्दल अहवाल देण्यासाठी मोजमाप आणि अहवाल साधन म्हणून पीआयआरचा वापर करण्यास सुरवात केली आहे.  इतर काही शाळांनी त्यांचा सामाजिक परिणाम सुधारण्यासाठी हे एक व्यवस्थापन साधन म्हणून वापरण्यास सुरवात केली आहे