गोवन्स अगेन्स्ट कोरोना मोहिमेने केला गोवेकरांच्या मनाला स्पर्श:आप

0
203
गोवा खबर:आपचे ऑक्सिमित्र राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचून गोवेकरांना कोरोनाच्या काळजीतून मुक्त होण्यास मदत करीत आहेत. आम्हाला आनंद होतोय की आमच्या मदतीमुळे लोकांचे जीव वाचत आहेत. या प्रवासात आम्ही अनेकांना भेटलो, अनेकांच्या आयुष्याला स्पर्श केला आणि अनेकांचा दुवा आणि धन्यवादही घेतले. आमच्या उपक्रमाला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून जे काम सरकारने हातात घ्यायला हवे होते, ते आम्ही करीत असल्याचा आम्हाला आनंद आहे. 
याविषयी मलायका यांनी बोलताना आप च्या ऑक्सिमित्रांचे कौतुक केले. आप चे ऑक्सिमित्र हे खूप चांगले काम करीत असून ते फार त्वरित प्रतिसादही देत असल्याचे त्या म्हणाल्या. मलायका आणि त्यांच्या मातोश्री श्रीमती सेलेस यांना आपच्या ऑक्सिमित्रांनी मदत केली. मलायका आणि तिच्या आईने त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेला मदत केली जी बाथरूममध्ये पडून जखमी झाली होती व बरेच तास एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलू शकत नव्हती. “माझ्या आईने अग्निशमन दलाला बोलावून दार उघडायला व तिला बाहेर काढायला मदत केली. पण नंतर ती बाई कोरोना पॉसिटीव्ह सापडली आणि आम्ही दोघी आमच्या चाचणी अहवालांची वाट पाहत होतो त्यावेळी आम्ही आपच्या ऑक्सिमित्रांना फोन केला आणि आमच्या प्राणवायू स्तर तपासण्याची विनंती केली. ऑक्सिमित्र लगेच आले आणि आम्हाला तपासणी करायला मदत केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद, असे मलायका म्हणाल्या.
आमच्या ऑक्सिमित्रांचे एका हळदोणेच्या व्यक्तीबरोबरही सूर जुळले. त्यांनी आम्हाला पाठिंबा देत सांगितले, “या मोहिमेबद्दल मी वर्तमानपत्रांमध्ये आणि फेसबुकवरही वाचले होते. मला वाटते की सर्वांनी आपला प्राणवायू स्तर तपासणे आवश्यक असून सर्व गोमंतकीय लोकांनी या मोहिमेत सहभागी झाले पाहिजे.”
पेडणे येथील शशिधर हळर्णकर यांनी याविषयीं बोलताना म्हटले, ” या महामारीमुळे सगळेच काळजीत आहेत. आपण बाहेर जातो त्यावेळी काय होईल याची कुणालाच शाशवती नसते. आप चे सदस्य आले व त्यांनी ऑक्सिजन स्तर तपासला आणि स्तर सर्वसामान्य असल्याचे कळल्यावर आम्हाला उत्साह वाटला.
गोवन्स अगेन्स्ट कोरोना ही फक्त आम आदमी पक्षाची एकतर्फी मोहीम ठरलेली नाहीये बरं का? लोकांचाही उत्स्फूर्त सहभाग यामध्ये दिसून येतोय. सगळ्यात आठवण चिंचीनी येथील वेलोनिया बरेटो या शाळकरी मुलीची आहे. तिने मोहिमेसाठी मदत म्हणून आमच्याकडे 9 ऑक्सिमीटर दान केलेले आहेत.