गोयंकारांना फॉर्मेलिनने मारणाऱ्या सरकारने गोयंकारपणाच्या बाता करू नये:कामत

0
2025
शिवसेना शिवोली विभाग कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी ( मध्यस्थानी बसलेले ) राज्य प्रमुख जितेश कामत, (डावीकडून बसलेले) दयानंद नाईक, दिपेश धारगळकर, विंसेत पेरेरा, उमेश केरकर 
 गोवा खबर:गोंयकारांना फॉर्मेलीनयुक्त मासळी उपलब्ध करुन मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई न करणार्‍यांना गोंय, गोंयकार, गोंयकारपण हे शब्द बॅनरवर लिहायला कींवा बोलायला लाज वाटली पाहीजे अशी टीका शिवसेना राज्य प्रमुख जितेश कामत यांनी शिवोली विभाग कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना  केली. शिवोली विभाग कार्यालयाचे उद्धाटन फर्नांडिस वाडो येथे शिवोली रेसिडेन्सी मध्ये  कामत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.
यावेळी बोलताना कामत यांनी  गोव्यातील भाजप आघाडी सरकार युवकांना नोकरी किंवा स्वयंरोजगार उपलब्ध करुन देण्यास सपशेल अपयशी ठरले असल्याचा आरोप केला. कामत म्हणाले भाजप आघाडी सरकार फक्त ढोबळ आश्वसने देऊन खोटारडेपणा करीत  आहे. भाजप सरकारने गेल्या ६ वर्षात विकासाच्या नावाखाली गोवा विकला असून कित्येक खात्यात गोमंतकियांकडून व्यवसाय हिसकावून घेऊन गोव्याबाहेरील खाजगी कंपन्यांशी करार करून त्यांना देण्यात आला आहे. दिखावू विकासापेक्षा आर्थिक विकास महत्वाचा असतो आणि आर्थिक विकास साधण्यासाठी बेरोजगारी घटवण्यासाठी झटले पाहीजे असे मत कामत यांनी व्यक्त केले.
पुढे  बोलताना ते म्हणाले , अशीच परिस्थिती सुमारे ५० दशके आधी मुंबईत उद्भवली होती तेव्हा  बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करून भुमीपुत्रांना न्याय मिळवून दिला होता आणि आता गोव्यातील भुमीपुत्रांना न्याय देण्यासाठी शिवसेनेचीच गरज आहे.शिवसैनिकांनी गोमंतकिय जनतेसाठी सैदव झटायला तयार असायला हवे.
 शिवोली विभाग उपप्रमुख विंसेत पेरेरा यांच्या नेतृत्वाखाली तीन शाखा प्रमुख जाहीर करण्यात आले. मार्ना-शिवोली शाखेचे दिपेश यशवंत धारगळकर, सडये-शिवोली शाखेचे उमेश केरकर आणि आसगाव शाखेचे दयानंद नाईक यांची शाखा प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. शिवोली मतदारसंघाच्या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून संपर्क साधण्यासाठी कार्यालय जरूरी होते म्हणून पुढाकार आपण कार्यालय सुरू केले असल्याचे विभाग उपप्रमुख विंसेत फर्नांडिस यांनी सांगितले. राज्य सरचिटणीस मिलींद गावस, शाखा प्रमुख दिपेश धारगळकर आणि उमेश केरकर यांनी आपले विचार मांडले. जिल्हा समितीचे राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले आणि मतदाता सर्वेक्षण समन्वयक झायगल लोबो यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रामुख्याने सचिव अमोल प्रभुगावकर, मंदार पार्सेकर,  वंदना चव्हाण, जेष्ठ पदाधिकारी श्रीकांत सिमेपुरूषकर, सचिव इरफान खान आणि मोठ्या संख्येने युवा शिवसैनिक उपस्थित होते.
 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवोली विभाग कार्यालयाचे उद्घाटन करताना राज्य प्रमुख जितेश कामत. सोबत विभाग उप प्रमुख विंसेत पेरेरा, श्रीकांत सिमेपुरूषकर आणि इतर शिवसैनिक.