गोयंकरांना मूलभूत अधिकारांसाठी उच्च न्यायालयाचे दार ठोठावे लागणे, हे सावंत सरकार : आपचे अपयश

0
183
गोवा खबर : आम आदमी पक्षाने निदर्शनास आणून दिले की, डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अखेर कोर्टामध्ये,दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत गोव्यातील लोकांना पेंशन दिली गेली नाही,हे मान्य केले.
आप गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे यांनी निदर्शनास आणून दिले की, महामारीमुळे बहुतेक लोकांचे जगण्याचे साधन गमावले,त्यामुळे कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या गरजू लोकांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली.
सरकारने न्यायालयात असे कबूल केले आहे की, त्यांनी प्रति महा २,००० रुपयांची अपंग व्यक्तींना देण्यात येणारी रक्कम, त्यांना २० सप्टेंबर २०२० पासून म्हणजेच मागील सहा महिन्यांपासून देऊ केली नाही. तसेच या काळात जनतेने आपले जीवन कसे व्यतीत केले असेल, याबाबत त्यांनी विचारणा केली.
सरकारकडे पैसे नसल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला आणि २०,००० कोटी रुपये कुठे जात आहेत, याबाबत विचारणा केली आणि लोकांना त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांसाठी न्यायालयाचे दार ठोठावं लागत असेल,तर ही अत्यंत वाईट परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.
राहुल म्हणाले की, गोव्यातील जनतेने डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांच्या स्वयंपूर्ण दाव्यांवरील सर्व विश्वास गमावला आहे आणि डीएसएसएसच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचा मदत निधी कधी मिळेल, याची तारीख मुख्यमंत्र्यांनी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.