गोमचिम 2018 ची प्रतिनिधी नोंदणी आजपासून

0
1173

गोवाखबर:गोव्याबरोबर सिंधुदुर्ग आणि बेळगाव मधील मराठी चित्रपटप्रेमी ज्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाची आतुरतेने वाट बघत आहेत त्या 11 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सव 2018 ची प्रतिनिधी नोंदणी आज पासून राज्यात विविध ठिकाणी आणि बूक माय शो डॉट कॉम या वेबसाइट वरुन सुरु झाली आहे.
8,9 आणि 10 जून रोजी होणाऱ्या गोमचिम 2018 ची घोषणा झाल्या नंतर प्रतिनिधी नोंदणी केव्हा सुरु होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते.आज पासून ही प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली असून त्याला उदंड प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा विन्सन परिवारा तर्फे व्यक्त करण्यात आली आहे.


गोमचिमची प्रतिनिधी नोंदणी पुढील ठिकाणी सुरु आहे.800 रुपये भरून चित्रपट प्रेमी प्रतिनिधी होऊ शकणार आहेत . वास्को मध्ये विन्सन ग्राफिक्स,अनंताश्रम हॉटेल जवळ,पणजीत विन्सन ग्राफिक्स,गेरा एम्पोरियम 2,पाटो प्लाझा, कला अकादमी,पणजी,म्हापशात नाटेकर फार्मसी,फोंड्यात रंग रचना आणि मडगाव मध्ये माया बुक स्टोअर मध्ये प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली आहे.
ज्याना ऑनलाइन बुकिंग करायचे असेल त्यांच्यासाठी www.bookmyshow.com या वेबसाइटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.